आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरावर पडला दरोडा, नव्या नवरीनेच चोराला पाठलाग करून पकडले, आता होतोय कौतुकाचा वर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत - लग्नानंतर सासरी आलेल्या नव्या नवरीने दुसऱ्याच दिवशी घरात होत असलेली चोरी हाणून पाडली. घरात चोरी करत असलेल्या चोरांना नववधूने पाठलाग करून पकडले. त्यांच्याही लढा देत हातातून रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. यानंतर चोराला एका रूममध्ये बंदसुद्धा केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले. दबंग सुनेचे हे रूप पाहून शहरातील लोकच नाहीत, तर पोलिसही आता कौतुक करत आहेत. ही घटना पानिपतच्या तहसील कॅम्प येथील जवाहरनगरची आहे.


नवरीने धावत जाऊन चोराला पकडले...
> गारमेंट्स व्यावसायिक वीरेंद्र कुमार यांचा मुलगा ईशांतचे स्नेहसोबत 21 सप्टेंबर रोजी लग्न झाले होते.

> लग्नानंतर भाऊ राज कुमारच्या घरी कुटुंबाचे निमंत्रण होते. रविवारी रात्री 1 वाजता भाऊ नरेश पुतण्या ईशांत व सून स्नेहला घेऊन घरी पोहोचला. नरेश खाली उभा होता. सून व ईशांत पहिल्या मजल्यावर आपल्या घरात गेले, तेव्हा दाराचे लॉक तुटलेले दिसले.

> दार उघडताच चोरांना पाहून ते घाबरले, तेवढ्यात सुनेने आरडाओरड सुरू केली. चोर पळून जाऊन लागले. यादरम्यान स्नेहने पाठलाग करून पैशांनी भरलेली बॅग घेऊन पळत असलेल्या एका चोराला पकडले, दुसरा चोर छतावरून पसार झाला.

> कुटुंबीय म्हणाले, बॅगमध्ये दीड लाख रुपये रोख रक्कम होती. तहसील कॅम्प पोलिस चौकी इंचार्ज विनीत म्हणाले, पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्की असे आहे. आरोपीला पूर्वीही चोरीच्या केसेमध्ये तुरुंगवास झालेला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीची चौकशी केली जात आहे.

 

छताला शिडी लावून आले होते चोर
वीरेंद्र यांच्या पत्नी म्हणाल्या की, पावसादरम्यान कुणीच नसल्याचे पाहून चोर एका निर्माणाधीन घराला शिडी लावून त्यांच्या छतावर पोहोचले. येथे एक खिडकी काढून ते पहिल्या मजल्यावर आले आणि दाराचा कडीकोयंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. 

 

बातम्या आणखी आहेत...