आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 23 दिवसानंतर पळून गेली नवविवाहीता, पोलिसांनी शोधल्यावर सापडली आपल्या लेसबिअन पार्टनरसोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर(राजस्थान)- येथून आपल्या लग्नाच्या 23 दिवसानंतर बेपत्ता झालेली राजस्थानची एक महिला हरियाणामध्ये आपल्या समलैंगिक पार्टनरसोबत सापडली. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये राहणाऱ्या महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानतंर पोलिसांनी हरियाणाच्या मानेसरमधून सोमवारी महिलेला शोधून काढले.


नवविवाहीता आपल्या महिला जोडीदारासोबत होती, जी एक राष्ट्रीय चँपियनदेखील आहे. आपल्या महिला जोडीदारासोबत राहण्यासाठी तिने आपल्या पतीच्या घरातून पळ काढला. त्या दोघी मागील चार वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत.

 

त्या दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मजिस्ट्रेट समोर सादर करण्यात आले, जिथे त्या म्हणाल्या की, त्या दोघी सुजान आहेत आणि कोणासोबत राहायचे ते त्यांना चांगेलच माहीत आहे. तसेच तिचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचेही तिने पोलिसांनी सांगितले.