Maharashtra / दुचाकी ट्रकवर आदळली, मागची जीप अंगावरून गेल्याने नवदांपत्याचा मृत्यू

त्यांचे अवघ्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते

प्रतिनिधी

Jul 27,2019 09:17:31 AM IST

परभणी- भीषण अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दाम्पत्य रस्त्यावर पडले, त्यानंतर मागून येणारी भरधाव जीव त्यांच्या डोक्यावरुन गेली. या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. मानवत जवळील रत्नापूर शिवारात हा भीषण अपघात झाला.

परभणी जिल्ह्यातील मानवत जवळील रत्नापूर शिवारात मोटारसायकलवरुन जात असताना त्यांच्या भीषण अपघात झाला. रस्त्यावरुन जात असताना समोरुन जात असलेल्या जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यानंतर मागून भरधाव येणारी जीप त्यांच्यावर चढली. या भीषण अपघातात जीपचे चाक पत्नीच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी पतीनेही जीव सोडला.

या दाम्पत्याचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

X
COMMENT