आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्वालियर- शहरातील एका युवतीचा कतरमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयीतरित्या मृत्यु झाला. ही घटना 27 डिसेंबरला घडली पण 25 डिसेंबरला तिने भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता, त्यात तिने मला नवऱ्यापासून वाचवा नाहीतर तो मला मारून टाकेल असा मेसेज पाठवला होता.
ऑडिओ टेपमध्ये ऐकवली होती आपबीती
- मृत्युपूर्वी ममताने तिचा मोठा भाऊ रामेश्वर बघेल याला एक एक ऑडिओ टेप पाठवून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितेल होते. कुटुंबाला यांतील काही कळायच्या आत कतर दोहामधून ममताचा नवरा रविन्द्रने फोन करून तिच्या मृत्युची माहिती दिली.
- घटनेनंतर कुटुंबीयांनी ममताच्या मृतदेहाला ग्वालियर आनण्याची प्रयत्न सुरू केला, यांत छतरपुरच्या एसपी सोबत संपर्क केल्यानंतर ग्वालियर एसपी नवनीत भसीन यांची भेट घेतली पण त्यांन कोणतीही मदत केली नाही.
कुटुंबीयांनी मागितली मदत
- गुरुवारी सकाळी सोशल मीडीयावर 14व्या बटालियनमध्ये असलेले रामेश्वर बघेल यांनी बहिणीच्या मृतदेहाला कतरमधून ग्वालियर आनण्यासाठी आणि तिच्या नवऱ्याला या मृतुस कारणीभूत ठेवण्यासाठीचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर केला, त्यानंतर लोकांनी त्यांना मदत केली.
- याआधी ममताचे कुटुंबीय 7 दिवसांपासून तिचा मृतदेह करमधून ग्वालियर आनण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत तिचा ममताचा मृतदेह गावी नेण्यासाठीची कारवाई पूर्ण केली.
2015 मध्ये झाले होते लग्न, 5 लाख आणि एक्सयूवी कार मागत होता नवरा
- ग्वालियरच्या झांसी रोड परिसरातील न्यू पारस विहार कॉलोनीत राहणारे रामेश्वर बघेल 14व्या बटालियनमध्ये एसएएफ पदावर आहे. त्यांनी छोटी बहिण ममता बघेल(26) चे लग्न 27 नोव्हेंबर 2015 ला छतरपुर निवासी रविन्द्र बघेल, जो कतर एअरबेसमध्ये एअरनॉटिकल इंजीनियर आहे त्याच्यासोबत लावले.
- चांगली नोकरी असूनदेखील रविंद्र तिला हूंड्यासाठी त्रास द्यायचा. त्याला 5 लाख रूपये आणि 18 लाखांची गाडी हवी होती. त्यासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही ममताला त्रास द्यायचे. तिने कुटुंबातील सगळ्यासोबत झालेल्या चॅटींगची स्क्रीनशॉट भावाला पाठवली होती
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.