आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल मात्र अद्याप कोणालाही अटक नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आत्महत्या नसून हत्या असल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप
  • गुन्हा दाखल होऊनही अटक होत नसल्याने पीडित कुटुंबीयांचा पोलिसांच्या तपासावर संशय

रायगड -  सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने विष प्राशन करून जीवन संपवले. माहेरहून पैसे आणत नाही म्हणून तिचा छळ केला जात होता. पनवेलमधल्या नितलस गावात ही घटना घडली. लग्न होऊन जेमतेम सहा महिन्यातच नवविवाहितेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शर्मिला पावशे (वय 19) असे मृत नवविवाहितेच नाव आहे.



माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला करायचे मारहाण


तळोजामधल्या नितळस गावातील सतीश पावशे याच्यासोबत शर्मिलाचा विवाह झाला होता. लग्नमंडपातून सासरच्या मंडळीनी तिच्यावर जाच करण्यास सुरुवात केली होती. लग्नात जेवणासाठी नवरा सतीश पावशे याने आपल्याला मांसाहारी जेवण का दिले नाही? यावरून गोंधळ घातला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी साधारण दोन महिने तिला गुण्यागोविंदाने नांदविले. नंतर ते किरकोळ कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. गेल्या काही महिन्यांपासून माहेराहून दागिने आणि पैसे आण, असा तगादा शर्मिलाच्या मागे लावला होता. मात्र, तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे तिने टाळाटाळ केली होती. त्यातून तिला शिवीगाळ, मारहाण होऊ लागली होती.



आत्महत्या नसून हत्या असल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप


आपण सतत देत असलेला त्रास ती निमूटपणे सहन करते पण माहेराहून पैसे आणि दागिने आणत नाही, हे पाहून शर्मिलाच्या सासरच्या मंडळींनी तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार ती तिच्या भावाला फोनवर सांगत होती. तिच्या भावनेही सासरच्या मंडळीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या त्रासातून सुटका मिळेल म्हणून शर्मिलाने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घरातील विषारी औषध प्राशन करून तिने आत्महत्या केली. शर्मिलाच्या कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप केला.



पोलिसांच्या तपासावर संशय 


शर्मिलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर तळोजा पोलिसांनी शर्मिलाचा पती सतीश पावशे, सासू जयवंता पावशे, सासरे शमन पावशे, दीर जगदीश पावशे आणि नणंद दीपलता पाटील या पाच जणांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याने संतापलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला

बातम्या आणखी आहेत...