Maharashtra Crime / बीडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या की हत्या...? जेसीबी घेण्यासाठी सासरचे लोक पैशांची करायचे मागणी

आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले

दिव्य मराठी वेब टीम

Jun 04,2019 06:56:00 PM IST

बीड- जेसीबी मशीन खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणत, वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची सासरच्या लोकांकडून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात घडला प्रकार. या प्रकरणी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमृता तांबे असे मृत महिलेचे नाव आहे. 2018 जूनमध्ये तिचे लग्न झाले होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच तिचा पैशासाठी छळ सुरू झाला होता. याबाबत तिने अनेकवेळा आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. दरम्यान मंगळवारी पहाटे अमृताचा मृत्यू झाल्याची माहिती घरच्यांना समजली.


अमृताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला, मात्र तिने गळफास घेतला नसून जेसीबीसाठी पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा खून करण्यात आला. त्यामुळेच तिच्या पतीसह सासरच्या लोकांना अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

X
COMMENT