आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भिंड(मध्यप्रदेश)- अपघातात एक युवकाचा मृत्यु झाला, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले. अपघात शनिवारी दुपारी 1 वाजता झाला. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेले तर मृत युवकाला शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले. मृत युवकाचे 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तो लग्नाच्या व्हिडीओ कॅसेटवर कुटुंबीयांचे नाव टाकण्यासाटी स्टुडिओमध्ये जात होता पण त्याआधीच त्याचा अपघात झाला.
घरात होते लग्नाचे वातावरण पण आली मुलीच्या मृत्युची बातमी.
अपघातात कीरतपूरा निवासी शैलू तोमर(22) याचा मृत्यु झाला. 15 डिसेंबर 2018 ला त्याचे टेडा गावातील पूजासोबत लग्न झाले होते. घरात अजूनही लग्नाचे वातावरण होते. तो शनिवारी दुपारी त्याचे मित्र शिवम तोमतसोबत लग्नाच्या व्हिडीओ कॅसेटमध्ये कुटुंबीयांचे नाव टाकण्यासाठी स्टुडीओत जात होता. तो स्वत: गाडी चालवत होता तेव्हा अचानक काली माता मंदिराच्याजवळील बायपास रोडवर गाडीसमोर गाय आली आणि त्याचा गाडीवरूल कंट्रेल सुटले. त्यानंतर समोर सायकलवरून येणाऱ्या श्यामसुंदर राजावत (12) याच्यासोबतच त्याची टक्कर झाली आणि शैलूचा जागीच मृत्यु झाला. यांत शिवम आणि श्यामसुंदर गंभीररित्या जखमी झाले.
21 दिवसांपूर्वी झाले होते लग्न
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली आणि जखमींनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले. त्यानतंर मृत शैलूच्या मृतदेहाला शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांन सोपवले. पोलिसांनी अक्समात मृतुची नोंद केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.