आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Newly Wed Husband Kills Wife Chops Own Private Part After Coming Home In Up Gorakhpur

परप्रांतातून सुटी घेऊन घरी आला, बायकोला म्हणाला संबंध बनव! नकार देताच केले पाशवी कृत्य, अन् स्वतःचा प्रायव्हेट पार्ट देखील छाटला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - भल्या माणसाला देखील वासना सैतान बनवू शकते याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशात समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. तिची चूक एवढीच की तिने आपल्या पतीसोबत संबंध बनवण्यापासून नकार दिला होता. त्यावर पती इतका संतापला की त्याने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःचा प्रायव्हेट पार्ट छाटला आहे. रक्तरंजित अवस्थेत आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अनवर उल-हसन असून तो गुजरातमध्ये काम करत होता. मूळचा गोरखपूर येथील रहिवासी असलेल्या हसनचा वर्षभरापूर्वीच एका 20 वर्षांच्या तरुणीसोबत निकाह झाला होता. परंतु, परप्रांतात नोकरी असल्याने त्याला सतत पत्नीपासून दूर राहावे लागत होते. दोन दिवसांपूर्वीच हसन सुटी घेऊन घरी आला होता. यानंतर तिसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी शेजाऱ्यांना महिलेचा मृतदेह आणि त्या शेजारी रक्तात माखलेल्या अवस्थेत हसन सापडला. त्यांनी वेळीच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले.


त्या रात्री नेमके काय घडले होते हे आता पोलिस तपासात समोर आले आहे. परप्रांतातून घरी आलेला हसन पत्नीला शारीरिक संबंधांची मागणी करत होता. परंतु, पत्नीने त्याला नकार दिला. गेल्या दोन दिवसांपासून याच गोष्टीवरून भांडण सुरू होते. यानंतर रविवारी रात्री हसनने पुन्हा पत्नीला तीच मागणी केली आणि पत्नीने पुन्हा नकार दिला. याच गोष्टीवरून हसन इतका संतापला की त्याने पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेतला. यानंतर अनवरुल हसनला स्वतःवर किळस आली. त्याने धारदार शस्त्राने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला. तो सध्या गोरखपूरच्या राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहे. तसेच पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.