आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: 4 महिन्यांच्या संसारानंतर पतीने केली 'ती' मागणी, विवाहितेने उचलले असे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाला अवघे 4 महिने झालेले असताना किरणने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. - Divya Marathi
लग्नाला अवघे 4 महिने झालेले असताना किरणने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

इंदूर -  लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी मोठ्या अपेक्षा घेऊन सोबत जात असते. परंतु समाजात असलेल्या चालीरीती तिचे जगणे मुश्कील करून टाकतात. दररोज हुंडाबळीच्या घटना समाज वाचत असतो अन् बधीर मनाने कानानिराळ्या टाकत असतो. परंतु काही घटना या कायम मनात घर करून जातात. अशीच एक घटना गतवर्षी समोर आली होती ज्याची येथे माहिती देत आहोत.

 

लग्नाला अवघे 4 महिने झाले होते...

लग्नाला अवघे चार महिने झाले असताना नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूआधी तिने आपल्या डायरीत 4 ओळींचा मजकूर लिहून ठेवला. माहेरचे म्हणाले की, सासरचे तिचा हुंड्यासाठी छळ करत होते. यामुळेच तिने हे पाऊल उचलले.

 

असे आहे प्रकरण...
- राजेंद्र नगरच्या शिवसागर कॉलनीत राहणाऱ्या किरणने सोमवारी संध्याकाळी विष प्राशन केले होते. कुटुंबीय तिला घेऊन रुग्णालयात गेले, तेथे तिची प्राणज्योत मालवली. 
- नुकतेच 4 महिन्यांपूर्वीच तिचे हरिरामशी लग्न झाले होते. किरणचे वडील कैलाशचंद्र सोलंकी म्हणाले की, ती खूप होतकरू-हुशार होती. तिने बीएडही केले होते. लग्नानंतर हरिराम तिला घेऊन इंदुरात शिफ्ट झाला होता.
- लग्नात हरिरामने बाइकची मागणी केली होती. आम्ही त्याला म्हटले होते की, आमची तुम्हाला बाइक देण्याची परिस्थिती नाहीये. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही सुरळीत होते. पण मागच्या काही दिवसांपासून तो किरणचा माहेरातून बाइक आणण्यासाठी छळ करत होता.
- हरिराम किरणचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. याच छळाला कंटाळून किरणने विष प्राशन करून जीव दिला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

हे लिहिले सुसाइड नोटमध्ये...
"मी हे सर्व माझ्या मर्जीने करत आहे.
मला माझे हे जीवन जगण्याची इच्छा नाही." - किरण

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...