आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर देशात परतले DeepVeer; विमानतळावर नव-वधूसाठी प्रोटेक्टिव्ह दिसला रणवीर, असा होता नवदांपत्याचा Look

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - विवाह बंधनात अडकून मिस्टर अॅन्ड मिसेस सिंग झालेले रणवीर आणि दीपिका भारतात परतले आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी 8 वाजता दोघेही स्पॉट झाले. यावेळी दोघांनी क्रीम कलरचे मॅचिंग ड्रेस घातले होते. तसेच दोघांच्या डोळ्यांवर गॉगल होता. दीपिकाने नेकलेस देखील घातला होता. तसेच कुंकू आणि लाल ओढणीमध्ये नववधू दीपिकाचा लुक आणखी उजळून दिसत होता. दीपवीरने मीडिया आणि आपल्या फॅन्ससोबत फोटोसेशन देखील केले. विमानतळावरून एकमेकांचे हात धरून बाहेर येणाऱ्या या नवदांपत्याला मीडियाने फोटोंसाठी घेराव घातला. यावेळी रणवीर आपल्या वधूसाठी प्रोटेक्विव्ह दिसून आला. 

 

रणवीरने नववधुप्रमाणे सजवले घर
- रणवीरने आपल्या नव्या नवरीसाठी आपले घर नववधुप्रमाणे सजवले आहे. त्याने फक्त आपले घर सजवले नाही तर संपुर्ण सोसायटीमध्ये लायटिंग लावली आहे. या गोष्टीमुळे त्याचे मन भरले नाही, तेव्हा त्याने त्याच्या संपुर्ण कॉलनीला लायटिंग लावली. भितींवर फूलं आणि झाडांवर रंगीबेरिंग लाइट लावले.
- रणवीरने फक्त बंगल्यावर नाही तर घराबाहेर असलेल्या झाडांवर लायटिंग लावली आहे. नववधुप्रमाणे सजलेल्या बंगल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रणवीर प्रभादेवी, मुंबईच्या ज्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्याने एक पुर्ण फ्लोर त्याने खरेदी केले आहे. पूर्ण फ्लोअरचे रिनोव्हेशन केले आहे. वृत्तानुसार दीपवीर याच बंगल्यात राहणार आहेत. या फ्लॅटची किंमत जवळपास 15 कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...