आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Newly Weds Wife's Mental Condition Worsened After Husbands Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रडत आहे परिवारातील प्रत्येक व्यक्ती, पण सून मात्र नटून-थटून आणि हसत विचारत आहे फक्त एकच प्रश्न; कोणाकडेच नाहीये त्या प्रश्नाचे उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कादियां (जालंदर) : गुरूवारी सकाळच्या सुमारास ईजी डे समोर एक फॉरच्यूनर आणि द्चाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. वैभव पवन शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. रस्त्यावर चुकीच्या दिशेने येऊन फॉरच्यूनरने दुचाकीला धडक दिली. याबाबत मृत युवकाच्या कुटुंबीयांनी कादियां पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

 

आरोपीला वाचविण्याचा करण्यात येत आहे प्रयत्न

मृत युवकाचे पिता पवस शर्मा यांनी पोलिस तक्रारीत सांगितले की, अपघातातील गाडी कादियां येथील एका परिवाराची आहे दुर्घटनेवेळी ती कोण चालवत होते. याबाबत लवकरात लवकर तपास करून कारवाई करण्यात यावी. तसेच बाइकचे टायर फुटल्यामुळे अपघात झाला असल्याचे लोकांनी खोटे सांगून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  त्यांनी पुढे सांगितले की, बाइकची अवस्था चांगली असून ती पोलिस ठाण्यातच जमा करण्यात आलेली आहे. पोलिसांना त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

सून विचारत आहे एक प्रश्न, कोणाकडेही नाहीये त्याचे उत्तर

वैभव पत्नी पतीच्या निधनानंतर धक्क्यात आहे. ती स्वतःशीच बडबड करत आपल्या पतीची वाट पाहत आहे. कुटुंबीय सुनेला संभाळण्याचा प्रयत्न करत होते पण ती नटून-थटून आणि हसत सर्वांना एकच प्रश्न विचारत होती - ते कधी येणार आहेत?. पण सुनेला दिलासा देण्यासाठी कुटुंबीयांकडे काहीही उत्तर नाहीये.