आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत जाताना बाइकच्या चाकात अडकली नववधूची ओढणी, रस्त्यावर पडताच मागून आला भरधाव टेम्पो

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

ठाणे - बाइकवर जाताना ओढणी किंवा पदर जीवघेणा ठरू शकतो याचे आणखी एक उदाहरण ठाण्यात समोरे आले आहे. येथील भावले गावात एका नववधूचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. कारण एवढेच की ती आपल्या पतीसोबत बाइकवर जात होती आणि तिची ओढणी मागच्या चाकामध्ये अडकली होती. पोलिसांनी शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नवविवाहित दांपत्य आपल्या एका नातेवाइकाला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री निघाले असताना ही घटना घडली आहे.

पोलिसांनी सांगितले, की चिंचवली येथील रहिवासी असलेली कीर्ति जाधव (22) हिचा विवाह नुकताच पार पडला होता. कीर्ति आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी पतीसोबत कल्याणच्या दिशेने निघाली होती. ती एका बाइकवर मागच्या सीटवर बसली होती. भावले गावाजवळ असतानाच तिची ओढणी मागच्या चाकात अडकली आणि अचानक ती रस्त्यावर पडली. तेवढ्यात मागून भरधाव टेम्पो आला आणि तिला चिरडले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यासंदर्भात अज्ञात टेम्पो ड्रायव्हरविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 304 अ (निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे), कलम 279 (बेजबाबदारपणे वाहन चालवणे), कलम 337 (स्वतःचे आणि दुसऱ्यांचे जीव धोक्यात टाकणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.