आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Newlyweds Couldn’t Go For Honeymoon Because Of Rare Disease, Doctors Diagnosed The Rare Disease To Let Them Have Their First Time

दुर्मिळ घटना: लग्नाच्या 6 वर्षांपर्यंत संबंध ठेवू शकले नाही हे कपल, महिलेने सांगितली आपली दु:खद कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका दांपत्याला लग्न होऊन 6 वर्षे उलटूनही एका आजारामुळे हनीमूनवर जाता आले नाही. वास्तविक, लग्नानंतर दोघेही रिलेशन ठेवू शकत नव्हते. डॉक्टर्स म्हणाले की, महिलेला एक दुर्मिळ आजार होता, ज्यामुळे ती रिलेशन बनवू शकत नव्हती. या दांपत्याला अपत्याचे सुख हवे होते, परंतु मूल होणे अशक्य होऊन बसले होते. या आजारात नुकतीच बरी झाल्यावर महिलेने आपली ही दु:खद कहाणी शेअर केली आहे.

 

काय झाले होते महिलेला... 
- डॉक्टर्स म्हणाले की, एमिली नावाच्या या महिलेला एक अत्यंत दुर्मिळ आजार vaginismus होता. या आजारात काही मसल्स दगडासारख्या होतात. आणि पेनेट्रेशनच्या दरम्यान व्यवस्थित काम करू शकत नाहीत. महिला याच त्रासातून जात होती. तिला भयंकर वेदनांचा सामना करावा लागत होता.

 

6 वर्षे डॉक्टरांनाही दाखवले नाही 
- एमिली सांगते की, तिने 6 वर्षांपर्यंत डॉक्टरांना या समस्येबाबत सांगितले नाही. आधी दोघांनाही वाटले की, ही साधारण समस्या असेल आणि काळाबरोबर सगळे ठीक होईल. परंतु ती वेळ काही आली नाही. शेवटी डॉक्टरांना त्यांनी लाजत-लाजतच सगळी माहिती दिली.

- 6 वर्षांनंतर दोघांना जाणवले की, आतापर्यंत त्यांना मूल व्हायला हवे होते. यामुळे त्यांनी डॉक्टरांची मदत घेतली. तब्बल 8 लाख रुपये खर्च केल्यानंतर एमिलीची सर्जरी झाली. यासाठी तिला कॅलिफोर्नियाहून न्यूयॉर्कपर्यंत प्रवास करावा लागला.

 

वाईट काळात पतीची खंबीर साथ
- एमिलीने भावुक होत सांगितले की, मला वाटू लागले होते की, मी कधीच आई बनू शकणार नाही. माझ्यातच बिघाड आहे. तो खूप कठीण काळ होता. मला माझ्या पतीवर दया यायची. मी त्यांची माफी मागत म्हणायचे की, मी डिफेक्टिव्ह आहे. परंतु, अशा काळातही माझ्या पतीने माझी साथ सोडली नाही. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

 

6 वर्षांनतर पहिला हनीमून
- सर्जरीनंतर दोघेही पहिल्यांदा हनीमूनसाठी हवाई बेटावर गेले. एमिलीने आपले फोटोज शेयर करत लिहिले, ''आता वाईट काळ संपला आहे.'' यानंतर एमिली पहिल्यांदा आई बनली. तिने आपला आई बनण्याचा अनुभव आणि या दुर्मिळ आजाराबाबत एक ब्लॉगही लिहिला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या दांपत्याचे आणखी काही Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...