आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीसाठी 2000 क्युसेकने निळवंडेतून विसर्ग:पाणी अडवले जाऊ नये म्हणून खास दक्षता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले -  जायकवाडीला द्यावयाच्या ३.८५ टीएमसीपैकी आतापर्यंत निळवंडे धरणातून दोन टीएमसी पाणी देण्यात आले आहे. उर्वरित १.८५ टीएमसी पाणी देण्याची गरज असल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून २ हजार क्युसेकने प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडले. १.८५ टीएमसी पाणी देण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता रामनाथ आरोटे यांनी दिली.

  
या महिन्यात जायकवाडीसाठी भंडारदरा व निळवंडेतून सोडलेल्या २ टीएमसी पाण्यापैकी प्रत्यक्षात जायकवाडीत  १.५० टीएमसी पाणी पोहोचल्याचा अंदाज आहे. बुधवारी सोडलेले पाणी जायकवाडीत पोहचावे म्हणून काळजी घेतली जात आहे. या भागात रोज केवळ ५ तास वीजपुरवठा सुरू राहणार आहे. निळवंडेतून शेती सिंचनाचे आवर्तन बंद केले आहे. त्यामुळे दिवसभरात १९ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत आहे. 

 

पाणी कुठे अडवले जाऊ नये म्हणून खास दक्षता
कोल्हार ते नेवासेपर्यंतच्या एकूण १४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी अडवण्यात येणार नाही किंवा शेतीसाठी  पाणी उचलले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...