आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये येलो व्हेस्टच्या निदर्शनाचा सलग सहावा शनिवार; इंधन दरासह करकपात करण्यात यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस-   फ्रान्समध्ये शनिवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले. येलो व्हेस्टने आपली निदर्शने सुरूच ठेवण्याचा हा सलग सहावा शनिवार होता. आंदोलनादरम्यान कार व ट्रकच्या अपघाताची घटना घडली. त्यात एका ३६ वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला. आतापर्यंतच्या निदर्शनांदरम्यान १० जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दीड महिन्यांपूर्वी तेलाचे वाढलेले दरावरून आंदोलनास सुरूवात झाली होती. पहिल्या दिवशी आंदोलनात सुमारे तीन लाख लोक सहभागी झाले होते. विरोधानंतर सरकारने माघार घेतली होती. जनक्षोभापुढे झुकत सरकारने तेलाचे दर कमी केले. मात्र आता राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. फ्रान्स सरकारने शुक्रवारी कर कपातीच्या पॅकेजला मंजुरी दिली. या कपातीमुळे निवृत्तीवेतनधारक व ओव्हरटाइम करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. आता निदर्शक मॅक्राॅन यांच्या राजीनाम्यावर आडून आहेत. 

 

ऑनलाइन याचिकेने सुरुवात
मे-२०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणारा विभागात काम करणाऱ्या एका महिलेने वाढत्या तेलाच्या दराविरोधात change.org या संकेतस्थळावर एक याचिका दाखल केली होती. ऑक्टोबर पर्यंत सुमारे ३ लाख लोकांनी त्यावर हस्ताक्षर केले. या महिलेच्या विभागात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी फेसबुकवर या याचिकेला शेअर केले. तेव्हा त्यावर एक पोस्ट लिहिली आणि १७ नोव्हेंबर रोजी ‘सर्व रस्ते बंद करा’, असे सांगून आंदोलनाचे आवाहन केले. त्याच्या समर्थनार्थ एका व्हिडिओत पिवळे जॅकेट परिधान करण्याची संकल्पनाही सांगितली. लोकांनी ही कल्पना उचलून धरली होती. 

 

सरकारी तिजोरीवर १.१९ लाख कोटींचा बोजा 
अर्थशास्त्रज्ञांच्या मते, आर्थिक पॅकेज दिल्यामुळे फ्रान्स सरकारच्या तिजाेरीवर १७ अब्ज (सुमारे १.१९ लाख कोटी) डॉलरचा बोजा पडणार आहे. 

 

५ हजारांहून जास्त लोकांना घेतले ताब्यात 
आतापर्यंतच्या निदर्शनांत १० जणांचा मृत्यू झाला तर  १८०० हून जास्त जखमी झाले. पोलिसांनी ५ हजाराहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. 

 

निदर्शकांची संख्या ४ हजारांवर  आली
१७ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या या निदर्शनात सुमारे २.८२ लाख लोक जोडले गेले. सहाव्या आठवड्यात केवळ ४ हजार निदर्शक रस्त्यावर उतरले होते.

बातम्या आणखी आहेत...