आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने मुलाच्या नावावर ठेवले पात्राचे नाव आझाद, अमिताभ बनले खुदाबख्श

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: आमिर खानने आपल्या घरी चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या 15 मित्रांना त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे रफ कट दाखवले आहे. सूत्राच्या मते, या चित्रपटाच्या अनेक गोष्टी हॉलीवूड 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन'शी मिळत्या-जुळत्या आहेत. यात फातिमा सना शेख आमिरची प्रेयसी नव्हे शिष्याच्या भूमिकेत आहे. 

 

या वर्षीचा प्रतीक्षेत चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' विषयी काही गोष्टी नुकत्याच समोर आल्या आहेत. चित्रपट सूत्राने या चित्रपटातील दोन मुख्य पात्राचा खुलासा केला आहे. यात आमिर खानच्या पात्राचे नाव आझाद आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या पात्राचे नाव खुदाबख्श ठेवण्यात आले आहे. आमिरने तर आपल्या पात्राचे नाव आपल्या धाकट्या मुलाचे नावावर ठेवले आहे.. आझाद. सूत्राच्या मते, या चित्रटावर पायरेट्स ऑफ कॅरेबियन चित्रपटाचा प्रभाव दिसून आला तसेच यातील पात्रदेखील तसेच दिसून आले आहेत. आमिरच्या पात्राचे बोलणे-चालणे आणि हावभाव पायरेट्सच्या कॅप्टन जॅक स्पॅरोसारखे दिसले. तर बिग बी यांचे पात्र खुदाबख्श हेक्टर बारबोसा यांच्या पात्रासारखे दिसले. या चित्रपटात वापरण्यात आलेले 1000 किलो वजनी जहाजदेखील तसेच पायरेट्समधील ब्लॅक पर्ल जहाजासारखे दिसले. आमिरच्या मित्रांनाही हा चित्रपट आवल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

15 खास मित्रांना दाखवला चित्रपट 
सूत्राच्या माहितीनुसार,आमिरने आपल्या घरीच चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या 15 मित्रांना हा चित्रपट दाखवला व त्यांच्याकडून प्रतिक्रया जाणून घेतल्या. मित्रांनी रॉ रफ कट पाहून चित्रपटावर आले मत मांडावे, अशी आमिरची इच्छा होती. आमिर प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याआधी या 15 मित्रांना दाखवत असतो, कारण हे मित्र त्यांना योग्य फीडबॅक देतात. असो, या चित्रपटाची पहिली झलक 27 सप्टेंबर रोजी रिलीज केले जाईल. 


- प्रॉड्क्शन हाऊसच्या एका सूत्रानी सांगितले की, चित्रपटात फातिमा सना शेख वॉरियरच्या भूमिकेत आहे. ती आमिरचे पात्र आझादच्या गँगमधील आहे. त्याची शिष्य आहे. यात कॅटरिना कैफ, आमिरच्या प्रेयसीची भूमिका करत आहे. या सर्वच कलावंतांनी तलवारबाजीसाठी चार-चार महिने प्रशिक्षण घेतले आहे. 

बातम्या आणखी आहेत...