Home | Maharashtra | Vidarva | Akola | News about AAP leaders murder case

मेहकरात हत्येचा कट; आठ ते दहा जणांना दिली होती लाखोंची सुपारी

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 12:52 PM IST

आपचे नेते मुकीम अहमद व साखरखेर्डा येथील शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा उलगडा केवळ धर्म ग्रंथाच्या आधारे झाल्याची माहि

 • News about AAP leaders murder case

  अकोला- आपचे नेते मुकीम अहमद व साखरखेर्डा येथील शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा उलगडा केवळ धर्म ग्रंथाच्या आधारे झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. दोघांच्याही हत्येचा कट हा मेहकरातच शिजला होता. तेथून दोन गाड्यांनी भरून लाखोंची सुपारी घेऊन हल्लेखोर अकोल्यात आले होते. त्यांनी दोरखंड आणि पोतेही सोबत आणले होते. त्यांना दिल्या गेलेल्या माहितीवरून ते आझाद कॉलनी स्थित असलेले तसब्बूर कादरी यांच्या घरात घुसले व सुरुवातीला मुकीम अहमद व नंतर शेख कादरी यांच्या गळ्यात दोरखंड टाकून त्यांची हत्या केली. या हत्याकांडात ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


  पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा कट हा मेहकरातच शिजला होता. तेथे पाच लाखांच्या जवळपास प्रत्येकाला सुपारी देण्यात आली. नंतर मुकिम अहमद व शेख शफी या दोघांचाही काटा कोठे काढायचा हे ठरले. आझाद कॉलनी स्थित असलेले तसब्बूर कादरी यांचे मुकिम अहमद यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांच्याकडे दोघांची ये-जा असते हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी तसब्बूर यांच्या घरी त्यांची भेट घेण्याचे ठरले. मात्र मुकीम अहमद व शेख शफी यांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जेव्हा दोघेही तसब्बूर याच्या घरी जेवायला गेले. तेव्हा तसब्बूर यांनी शेख चाँद याला मिसकॉल दिला. त्यानंतर आरोपी धाडधाड त्यांच्या घरात घुसले व मुकीम अहमद व शेख शफी शेख कादरी यांच्या गळ्यात दोरखंड टाकले. त्यांना फाशी दिली व त्यांचे मृतदेह पोत्यात भरून पातूर मार्गे मेहकर जवळील पाथर्डी घाटात फेकून दिले.


  पहिल्यांदा पोलिस अधीक्षक रात्रभर बसून होते एलसीबीत

  गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पहिल्यांदाच पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे एलसीबीत सर्व ठाणेदारांना घेऊन वेगवेगळ्या दिशेने तपास करीत होते. यापूर्वी कुण्याही पोलिस अधीक्षकाने गुन्ह्याच्या तपासासाठी रात्र जागून काढल्याची माहिती नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यांच्यासोबत एसडीपीओ उमेश माने पाटील, एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे, ठाणेदार संतोष महल्ले, ठाणेदार अन्वर शेख व एपीआय चव्हाण यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.


  तसब्बूर कादरी ढसाढसा रडला..
  घटना घडल्यानंतर तपास करण्यासाठी पोलिसांवरील वाढता दबाव पाहता रात्रंदिवस पोलिस तपास कार्याला लागली होती. शहरातील ठाण्यांचे ठाणेदार त्यांचे त्यांचे कसब पणाला लावत होते. मात्र जुने शहर ठाण्याचे ठाणेदार अन्वर एम. शेख व खदान ठाण्याचे पीएसआय हाशम यांनी गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती आहे. ज्याच्या घरातच हे हत्याकांड घडले. त्या तसब्बूर कादरी यांना त्यांनी विश्वासात घेऊन धर्मग्रथांचा दाखला दिला. धर्मग्रंथ पाहून तसब्बूर कादरी ढसाढसा रडला आणि त्याने ठाणेदार अन्वर शेख व पीएसआय हाशम यांच्यासमोर सत्य कथन केले. मुकीम अहमद व शेख शफी यांची भेट घेतील आणि निघून जातील, ते दोघांचाही खून करतील असे आपल्याला वाटले नव्हते, असे तसब्बूर याने सांगून हत्याकांडाचा घटनाक्रमच सांगितला. त्यानंतर एसडीपीओ उमेश माने पाटील, ठाणेदार संतोष महल्ले, एपीआय रामेश्वर चव्हाण हे आरोपी शेख असलम याला घेऊन घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहिल्यानंतरच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.


  असा आहे घटनाक्रम
  आरोपी चाँद व कौसर यांनी मेहकरातून एक स्कॉडा गाडी व दुसरी भाड्याने गाडी घेतली. दोन्ही गाड्या घेऊन ते ३० जुलै रोजी अकोट फैलातील शेख चाँद याच्या काकाच्या घरी पोहोचले. तेथून त्यांनी भाड्याने घेतलेली गाडी परत केली. तर काकाची गाडी व त्याची गाडी घेऊन ते आझाद कॉलनीत पोहोचले होते. काही अंतरावर थांबल्यानंतर ठरल्याप्रमाणे तसब्बूर याने आरोपींना मिसकॉल दिला. त्यानंतर आरोपी घरात शिरले व हत्याकांड घडले. मारेकरी पातूर मार्गे मेहकर दिशेने मृतदेहांची विल्हेवाटीसाठी निघून गेले.

Trending