आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या शाळकरी मुलांना वाहनाने चिरडले, एक ठार दोन जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मुलांना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने उडवल्याने झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये कालिकादेवीच्या दर्शनासाठी ही सर्व मुले जात असताना त्यांना या अज्ञात वाहनाने उडवल्याची माहिती मिळाली आहे. 


सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने नाशिकच्या वडाळे गावातील 7 मुले कालिकादेवीच्या दर्शनासाठी पहाटेच घरातून निघाली होती. ही सर्व मुले पायी देवीच्या मंदिराकडे जात होती. पण इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने या मुलांना उडवले. त्यानंतर त्याने त्याठिकाणाहून पळ काढला. पण या अपघातात काही मुले गंभीर जखमी झाली. त्यापैकी विशाल पवार नावाच्या मुलाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...