आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध लाचखोरी प्रकरणाचा तपास काढून बदली करण्यात आलेले डीआयजी मनीषकुमार सिन्हा यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बदलीविरुद्धच्या याचिकेत त्यांनी आरोप केला की, ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी तपासात हस्तक्षेप केला. डोभाल यांच्या सांगण्यावरूनच अस्थानांच्या घराची झडती राेखण्यात आली. लाच प्रकरणातील दोन मध्यस्थ डोभाल यांचे निकटवर्तीय आहेत. तक्रारदार सना सतीश बाबूने आपल्याला सांगितले होते की, सीबीआय संबंधित प्रकरणांत मदत करण्यासाठी केंद्रीय कोळसा व खाणमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांना कोट्यवधींची लाच देण्यात आली.’ चौधरी हे गुजरातेतून खासदार आहेत.
सिन्हांनी सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या पीठापुढे सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी लवकर केली जावी. कोर्टाला चकित करतील, असे दस्तऐवज आपल्याकडे आहेत. त्यावर कोर्ट म्हणाले, आम्ही कोणत्याही मुद्द्याने चकित होत नसतो. सुप्रीम कोर्टाने याचिका स्वीकारली, मात्र लवकर सुनावणीची मागणी फेटाळली.
राकेश अस्थाना, विरुद्ध कसून तपास केला जात आहे
याचिकेनुसार, ‘आंध्रच्या सना सतीश बाबूने चौकशीत अनेक प्रभावशाली लोकांची नावे घेतली. एक नाव अस्थानांचेही होते. १५ ऑक्टोबरला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १७ ऑक्टोबरला सीबीअाय संचालक आलोक वर्मांनी त्याची माहिती एनएसए अजित डोभाल यांना दिली. त्याच रात्री एनएसएने अस्थानांशी चर्चा केली. आपल्याला अटक करू नये, अशी विनंती अस्थानांनी एनएसएला केली.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.