आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत जामवालसोबतच्या रिलेशनशिपविषयी बोलली अदा, दिले असे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 16 व्या वर्षी '1920' चित्रपटातून पदार्पण करणारी अदा शर्माला इंडस्ट्रीत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 मध्ये हा चित्रपट आला होता. बॉलीवूड व्यतिरिक्त अदाने तामिळ, तेलुगू आणि कन्नड़ चित्रपटात काम केले. 

 

अदा शर्मा सध्या विद्युत जामवालसोबत आपल्या हिट फ्रेंचायजी 'कमांडो'च्या तिसऱ्या भागाचे शूटिंग करत आहे. अदा शर्माला तिचे प्रेम मिळाले, अशा काही बातम्या नुकत्याच आल्या होत्या. शिवाय ती आपल्या को-स्टार विद्युत जामवालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चादेखील होती. 'कमांडो 2' चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री दिसून आली होती. आता 'कमांडो 3' च्या शूटिंगच्यावेळी दोघे आणखीनच जवळ आले आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, सेटवरील उपस्थित लोकदेखील दोघांच्या नात्या विषयी चर्चा करत आहेत. 
मात्र, अदा शर्माने सर्वच बातम्यांचे खंडन केले आहे. तिच्या मते या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. ती म्हणाली, अशा गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही. मी आणि विद्युत फक्त चांगले मित्र आहोत. मी नेहमीच माझ्या को-स्टार्ससोबत मित्रत्वाच्या नात्याने वागते. मी सिंगल आहे आणि सिंगल असण्यातच मजा आहे.' 'कमांडो 3' च्या व्यतिरिक्त अदा सध्या प्रभुदेवाचा तामिळ चित्रपट'चार्ली चॅपलिन 2' चे शूटिंग करत आहे. याबरोबरच ती नील नितीन मुकेशच्या 'बायपास रोड' या भयपटातदेखील दिसणार आहे. एवढेच नव्हे तर ती एक माहितीपट 'मोह' देखील करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...