आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी आदित्यनाथ यांना गडकरी देणार बांबूपासून तयार कफनी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उपराजधानी नागपुरात २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या उद््घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांना बांबूच्या धाग्यांपासून निर्मित भगव्या कफनीचे दोन जोड भेट देणार आहेत. 
बांबू शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष असून भविष्यात बहुपयोगी बांबूपासूनच रोजगार मिळेल, असा ठाम विश्वास गडकरींना आहे. त्यामुळे पाहुण्यांना बांबूपासून निर्मित वस्तू देणे हा त्यांचा आवडता छंद आहे. ७० टक्के बांबूचे धागे व ३० टक्के कापसाच्या धाग्यापासून तयार केलेले भगव्या कफनीचे २ जोड भेटीसाठी तयार असल्याचे गडकरींनी पत्रकार परिषदेत सांगितले. २०१७-१८ च्या अॅग्रो व्हिजनच्या उद््घाटनासाठी आलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना गडकरींनी बांबूच्या धाग्यांपासून निर्मित शर्ट भेट म्हणून दिला होता. बांबू व कापसाच्या धाग्यांपासून निर्मित अंडरगार्मेंटला आखाती देशात खूप मागणी आहे. कारण या कपड्यांमुळे घाम येत नाही. बांबूपासून फर्निचर तसेच शोभेच्या व सजावटीच्या अनेक वस्तू तयार होतात. बांबूपासून निर्मित बायोफ्युएल राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. 

 

चंद्रपूरच्या संस्थेत बांबूपासून बनवली सायकल 
चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात बांबूचा वापर करून सायकल तयार करण्यात आली. वजनाने हलकी असलेली ही सायकल चालवण्यासही सोपी आहे, तर अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे गेल्या पाच वर्षांपासून बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जातात. 

बातम्या आणखी आहेत...