आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय चित्रपटांची आजपासून पर्वणी; प्रोझोन मॉलच्या आयनाॅक्स चित्रपटगृृहात उद‌्घाटन साेहळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादकर रसिकांना ९ जानेवारीपासून पाच दिवस दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पर्वणी अनुभवण्यास मिळणार आहे. नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.

 

या सोहळ्यात प्रख्यात कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले जाईल. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व ज्युरी कमिटी अध्यक्ष एन. चंद्रा, चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट निर्माते किरण शांताराम, सेक्रेड गेम्स मालिका, मंटोसारख्या चित्रपटांमधून ठसा उमटवलेली औरंगाबादची अभिनेत्री राजश्री देशपांडे, भारतातील स्वीडन राजदूतावासाचे राजदूत ब्यॉर्न होमग्रेन, फ्रेंच अभिनेत्री मारियान बोर्गो यांची याप्रसंगी उपस्थिती असेल. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील या वर्षी जन्मशताब्दी असणाऱ्या दिग्गजांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम नीरज वैद्य व श्रद्धा जोशी सादर करतील. उद्घाटनानंतर 'कोल्ड वाॅर' हा चित्रपट दाखवला जाईल. बांगलादेश, श्रीलंकन चित्रपटांचे सादरीकरण.

 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच दिवस चित्रपटाची पर्वणी 
बांगलादेश, स्वीडन, श्रीलंका आदी देशांतील तसेच आसामी, मराठी, हिंदीतील नामवंत दिग्दर्शकांच्या ५१ आशयघन चित्रपटांचा आनंद ९ ते १३ जानेवारी कालावधीत रसिकांना घेता येणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे प्रोझोन मॉल, आयनॉक्स येथे आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही संधी आहे. यातील ३६ चित्रपट पूर्ण लांबीचे, तर ११ शॉर्टफिल्म आहेत. 

 

त्याचा तपशील असा : 
१० जानेवारी रोजी स्क्रीन २ मध्ये सकाळी १०.१५ वाजता मंटो, दुपारी १.३० घटश्राद्ध, ३.३० आम्रीत्युम, ५.३० आम्ही दोघी, ८.१५ कोल्ड वॉर (पोलंड). स्क्रीन ३ मध्ये सकाळी १० वाजता वाइल्ड स्ट्रॉबेरीज (स्वीडिश), १२ गांधी आणि सिनेमा या विषयावर अमरीत गांगर यांचे विशेष व्याख्यान, ३ वाजता अब्बू, ४.४५ शॉर्टफिल्म स्पर्धेचे विशेष शो, ७.३० सिन्सिअरली युवर्स ढाका ही अकरा दिग्दर्शकांच्या अकरा कथा असलेली बांगलादेशी फिल्म. 

 

११ जानेवारी : 
स्क्रीन ३ सकाळी १०.१५ न्यूड, १२.३०. अॅश इज प्युअरेस्ट व्हाइट (चीन) ३ वाजता भोर, ४.४५ आरोन, ७ वाजता अंडरपॅँट्स थिप (श्रीलंका). स्क्रीन ३ - सकाळी १० द सेव्हन्थ सील, ११.४५ थिंकिंग ऑफ हिम (अर्जेंटिना इंडिया),२ वाजता परसोना, ३.४५ द स्वीट रिक्वियम (अमेरिका-भारत), ५.४५ एमजीएम फिल्म आर्ट शॉर्टफिल्म शो, ८.१५ द बॅड पोएट्री टोकियो (अंशुल चौहान दिग्दर्शित जपानी चित्रपट). 

 

१२ जानेवारी : 
स्क्रीन २ सकाळी १०.१५ अब्यक्तो (बंगाली), १२.३० लव्हलेस, २.४५ पेंटिंग लाइफ, ५.३० बंदीशाळा, ८.३० अॅश इज प्युअरेस्ट व्हाइट. स्क्रीन ३ सकाळी १० सॅराबँड, १२.१५ भुवन शोम (दिग्दर्शन मृणाल सेन) २ वाजता विथ मोबाइल फोन-एव्हरीवन इज अ फिल्ममेकर या विषयावर प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, अमरजित आमले, बकेट लिस्ट सिनेमाचे दिग्दर्शक तेजस देऊसकर, चित्रपट समीक्षक अमोल उदगीरकर व शिव कदम यांच्या उपस्थितीत परिसंवाद. ४.१५ व्हॉट विल पीपल से, ६.१५ नावाजलेल्या शॉर्टफिल्मचे प्रदर्शन, रात्री ९ गुड लक अल्जेरिया (फ्रेंच-बेल्जियम). 

 

१३ जानेवारी : 
स्क्रीन २ सकाळी १०.४५ द स्वीट रिक्वियम, १२ तलान (कझाकिस्तान), २ वाजता टेंपेटे (फ्रेंच). स्क्रीन ३ - सकाळी १० वाजता ऑटम सोनाटा, १२ प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा शॉर्टफिल्म मास्टर क्लास, २.३० जोहार मायबाप (दिग्दर्शक राम गबाले). 
 

 

बातम्या आणखी आहेत...