आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ- कायदा खााण उत्खनन प्रकरणात अडचणीत सापडलेले सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयारी दर्शवली. भाजप ही संस्कृती निर्माण करू पाहत आहे. परंतु उद्या त्यांनाही त्याचा मुकाबला करावा लागू शकतो, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे. सीबीआय छापे का टाकत आहे ? त्यांनी थेट मला विचारावे. आता तर आघाडीत आम्ही जागा वाटप कसे केले आहे, हे देखील सीबीआयला सांगावे लागणार आहे, असा टोला अखिलेश यांनी लगावला. यापूर्वी काँग्रेसने सीबीआयशी भेट घडवली होती. यावेळी भाजपने ही संधी दिली. भाजपने राजकीय शिष्टाचार संपवला. २०१२ ते २०१६ दरम्यान उत्तर प्रदेशात उत्खनन घोटाळा उजेडात आला होता. त्यावर सीबीआयने शनिवारी लखनऊमध्ये आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांच्या घरावर छापा टाकला. २०१२-१३ मध्ये उत्खनन विभागाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यांच्याकडे होता.
बिहार :पुढील आठवड्यात चर्चा सुरू
काँग्रेसचे बिहारचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल म्हणाले, पुढील आठवड्यापासून महाआघाडीबाबत राजद, काँग्रेस व इतर सहकारी पक्षांमध्ये चर्चा होईल. गत लोकसभेत बिहारच्या ४० जागांपैकी २७ मतदारसंघात राजद, १२ वर काँग्रेस, एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढले होते. राजद चार, काँग्रेस दोन व राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाले होते. या निवडणुकीसाठी रालोसपा व 'हम' उत्सुक आहेत.
महाआघाडीला पाक सीमेवर बुडवू : भाजप
भाजप नेते व मंत्री अश्विनी चौबे म्हणाले, विरोधकांची महाआघाडी म्हणजे ठकांची आघाडी. हे बेडूक नेहमीच डराँव..डराँव करते. सगळे जग आपल्यावरच अवलंबून आहे, असे त्याला वाटत असते. आम्ही महाआघाडीला पाकिस्तानच्या सीमेवर बुडवू, असे चौबेंनी म्हटले.
यूपीत सपा-बसपा सोबत, काँग्रेसची गरज नाही
सपाचे उपाध्यक्ष किरणमय नंद म्हणाले, उत्तर प्रदेशात पक्ष बसपासोबत लोकसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसची गरज नाही. काँग्रेस एक-दोन जागांवर असेल. सपा-बसपा आघाडी सोनिया गांधी यांच्या रायबरेली व काँग्रेस अध्यक्ष अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले जाते. राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. गत लोकसभेत सपाने पाच व काँग्रेसने दोन जागी विजय मिळवला होता. तेव्हा बसपाला एकही जागा नव्हती.
'यंदा जनताच भाजपला सातासमुद्रापार पाठवेल'
राजद प्रवक्ता मृत्युंजय तिवारी म्हणाले, भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते बिथरल्यासारखी वक्तव्ये देत आहेत. जनता भाजपला निवडणुकीत सातासमुद्रापार पाठवेल. भाजप फायदा घेऊ इच्छिते. आम्ही त्यांना रोखू.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.