Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about akola municipalty

सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत, एलईडी प्रस्ताव लटकला; मक्तदार न्यायालयात, होईना एकमत

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 12:58 PM IST

शहरात अंधार असताना त्यावर दिवे बसवले जात नाही. कारण स्मार्ट सिटी योजनेतून एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव आहे.

 • news about akola municipalty

  सोलापूर - शहरात अंधार असताना त्यावर दिवे बसवले जात नाही. कारण स्मार्ट सिटी योजनेतून एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्ताव सभागृहात घेऊन मंजूर करा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांची आहे. एलईडीच्या बाबतीत न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रस्ताव अजेंड्यावर घेण्याबाबत सत्ताधारी भाजपत दुमत आहे. त्यामुळे त्याचे सॅन्डवीच झाल्याची स्थिती आहे. प्रस्ताव घ्या असे मत मनपा सभागृह नेते संजय कोळी यांचे आहे तर नगरसेवक नागेश वल्याळ यांनी यासाठी विशेष सभा बोलवा, अशी मागणी केली आहे. चर्चेअंती एलईडीचा प्रस्ताव अजेंड्यावर येणार आहे.

  शहरातील जुने दिवे काढून नवीन दिवे बसवण्यासाठी महापालिकेने टेंडर काढले. त्यास दोनवेळा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी चार कंपन्यानी टेंडर भरले. त्यापैकी कर्नाटक सरकारचे, ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन प्रा. लि. नाशिक हे पात्र ठरले. दोघांनी शहरात प्रायोगिक तत्त्वावर एलईडी दिवे लावले. ई स्मार्ट एनर्जीचे काम समाधानकारक नसल्याने कर्नाटक राज्य सरकारच्या कंपनीस काम देण्याचे निश्चित केले. त्यामुळे एक कंपनी न्यायालयात धाव घेऊन मक्ता देण्यास आवाहन दिले.

  न्यायालयात याचिका असताना प्रस्ताव अजेंड्यावर घेता येतो का? याबाबत शहानिशा होत नाही. याप्रकरणी विशेष सभा बोलवा, अशी मागणी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केली आहे. वीज बिल किती वाचणार, त्यातून मनपास काय फायदा होणार, एक कंपनी जाताना नवीन लाइट बसवणार तर एक कंपनी बसवणार नाही. महापालिकेचे ६० टक्के वीज बचतीचे अपेक्षा असताना ७० टक्के बचतीची हमी आहे. तरीही दंडात्मक कारवाईत दुजाभाव का? ईईएसएल यांच्याशी तुलना करून मक्ता निश्चित करणे आवश्यक आहे, असे नगरसेवक वल्याळ म्हणाले.

  पक्षांतर्गत होणार चर्चा
  एलईडी दिव्याबाबत प्रस्ताव नगरसचिव कार्यालयात असून, तो अजेंड्यावर घेण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे रविवारी चर्चेनंतर अजंेड्यावर येणार आहे.

Trending