Home | Maharashtra | Vidarva | Akola | news about akola zp elections

उपाध्यक्ष, सभापतींसह गट नेते विस्थापित; नवीन गटाचा शाेध

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 12:58 PM IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी साेमवारी पाडलेल्या प्रभाग रचना आणि अारक्षण सोडतीनंतर विद्यमान पदाधिकारी, ज्येष्ठ

 • news about akola zp elections

  अकाेला- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी साेमवारी पाडलेल्या प्रभाग रचना आणि अारक्षण सोडतीनंतर विद्यमान पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्यांचे सर्कल (गट/मतदारसंघ) राखीव झाल्याने त्यांच्यावर नवीन मतदारसंघ शाेधण्याची वेळ अाली अाहे. काहींना स्वत:च्या कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरावे लागणार असून, अनेकांकडे तर पर्यायच नसल्याने त्यांच्या समर्थकांना संधी मिळू शकते. अारक्षण साेडतीचा फटका िज.प. उपाध्यक्ष, सभापतींना बसला असून, प्रभाग रचनेत अध्यक्षांच्या सर्कलमधून त्यांचे गावाचा समावेश नाही. तसेच अध्यक्षांचा सर्कल खुला झाल्याने दावेदारांची संख्याही अाताच वाढली अाहे. एकूणच सर्वच पक्षात साेयीच्या सर्कलमधून (गट-मतदारसंघ) उमेदवारी मिळण्यासाठी चढाअाेढ वाढणार अाहे.


  ३० डिसेंबर २०१८ पूर्वी जि.प.मध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण हाेणे अावश्यक अाहे. २७ अाॅगस्ट राेजी अारक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अावारात विद्यमान सदस्यांसह, माजी सदस्य-पदाधिकारी व इच्छुकांनी एकच गर्दी केली हाेती. अारक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण स्वत:साठी साेयीचा सर्कल कसा अाहे, हेच सांगत असल्याचे दिसून येत हाेते. अनेक वर्षांपासून प्रभाग रचना आणि अारक्षणामुळे राजकीय दृष्ट्या वनवास भाेगावा लागणारे अाता नवीन अारक्षणानुसार कामाला लागल्याचे दिसून अाले.
  हे झाले विस्थापित; अशी झाली काेंडी : १)भारिप-बमसंचे विद्यमान उपाध्यक्ष जमीर उल्लाखान पठाण यांचा हिवरखेड गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला अाहे. समाज कल्याण सभापती रेखा अंभाेरे यांचा देगाव गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात अाला अाहे. महिला व बालकल्याण सभापती देवकाबाई पाताेंड यांचा राजंदा गट अाता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला अाहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांचा दहिगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला अाहे.


  २) अारक्षणामुळे विविध पक्षांचे गट नेते, ज्येष्ठ सदस्यांवर सर्कल बदलण्याची, उमेदवार नवीन अथवा समर्थक उभा वेळ अाली अाहे. शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांचा चाेंढी आणि िवराेधी पक्ष नेते भाजपचे रमण जैन यांचा अालेगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले अाहेत. शिवसेनेचे महादेव गवळे यांचा अागर गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव झाला अाहे.


  ज्येष्ठांनी कुठे जावे

  भारिप-बमसं ज्येष्ठ सदस्य विजय लव्हाळे यांचा व्याळा गट आणि माजी उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख यांचा हातरूण गट अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव झाले असून अाहेत. भारिपचे गट नेते दामाेदर जगताप मलकापूर गट हा महापालिका हद्दवाढीमुळे संपुष्टात अाला अाहे. माजी अध्यक्ष शरद गवई यांचा कुरणखेड गत हा ना.म.प्र. महिलेसाठी राखीव झाला अाहे.


  अन बंडाेबा झाले थंडाेबा
  जून २०१६मध्ये दुसऱ्या टर्मसाठी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी भारिप-बमसंच्या विरोधात शिवसेना-भाजप-काँग्रेस व अपक्षांची महाआघाडी तयार करण्यात अाली हाेती. मात्र एेनवेळी शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे व माधुरी गावंडे यांनी महाआघाडीच्या पारड्यात मतदान केले नाही. या बंडखोरीमुळे भारिप-बमसंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला हाेता. अाज झालेल्या अारक्षण सोडतीमध्ये सदस्य पांडे यांचा बाेरगाव मंजू हा गट अनुसूचित जाती(महिला) प्रवर्गासाठी , तर कृषी सभापती माधुरी गावंडे यांचा कान्हेरी सरप हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला अाहे. तसेच पांडे यांना साेयीचा असलेला बाभुळगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात अाले.

Trending