Home | News | News about alia bhatt Kalank movie fees

'कलंक' साठी आलियाला मिळाले सर्वाधिक मानधन, घेतली 10 कोटी एवढी फीस 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 09, 2019, 12:00 AM IST

आलियाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती सध्या गलीबॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

  • News about  alia bhatt Kalank movie fees

    बॉलिवूड डेस्क. करण जोहरचा 'कलंक' चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज होईल. तो लवकरच त्याचे प्रमोशन सुरू करेल. यात आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्तसह इतर कलाकार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार.., मोठे कलाकार असूनही आलियाला यात सर्वात जास्त मानधन मिळेल. यासाठी तिला जवळजवळ 10 कोटी रुपये फीस दिली आहे. आलिया आजच्या काळातील शायनिंग स्टार आहे. विशेष म्हणजे 'राजी'मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून ती प्रेक्षकांना आकर्षित करू शकते, हे तिने सिद्ध केले.

    - आलियाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती सध्या गलीबॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह आहे. 14 फेब्रनवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
    - यासोबतच ती रणवीरकपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे.

Trending