Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | news about american open tennis

अमेरिकन अाेपन टेनिस: याेकाेविक 9 वर्षांत सातव्यांदा फायनलमध्ये; नदालची माघार

वृत्तसंस्था | Update - Sep 09, 2018, 09:18 AM IST

माजी नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि जुअान मार्टिन डेल पेत्राे यांच्यात अाता यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन

 • news about american open tennis

  न्यूयाॅर्क - माजी नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि जुअान मार्टिन डेल पेत्राे यांच्यात अाता यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या किताबासाठीचा फायनल मुकाबला हाेणार अाहे.

  सर्बियाच्या याेकाेविकने अापल्या करिअरमध्ये ९ वर्षांत सातव्यांदा या स्पर्धेची फायनल गाठली अाहे. दुसरीकडे गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे गतचॅम्पियन राफेल नदालने उपांत्य सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे डेल पेत्राेला विजयी घाेषित करण्यात अाले. जपानच्या केई निशिकाेरीला पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यातून त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्याचा फायनलमधील प्रवेशाचा प्रयत्न अपुरा ठरला. तसेच महिला एकेरीच्या फायनलमध्ये सेरेना अाणि अाेसाका यांच्यात झंुज रंगणार अाहे.

  याेकाेविकची २३ वी ग्रँडस्लॅम फायनल : याेकाेविकने सातव्यांदा अमेरिकन अाेपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला अाहे. त्याने करिअरमध्ये २३ व्या ग्रँडस्लॅमच्या फायनल गाठली. त्याने जपानच्या केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने ६-३, ६-४, ६-२ ने सामना जिंकला. याेकाेविकचा निशिकाेरीवरचा हा १५ विजय ठरला.

  याेकाेविक-पेत्राे पहिल्यांदा झुंजणार : सहाव्या मानांकित नाेवाक याेकाेविक अाणि जुअान मार्टिन डेल पेत्राे यांच्यात पहिल्यांदा फायनल हाेत अाहे. हे दाेघेही अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समाेरासमाेर असतील. यांच्यात अातापर्यंत इतर सामने १८ झाले अाहेत.


  नाेवाक याेकाेविकची सॅम्प्रासशी बराेबरी
  सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकने अंतिम फेरीतील प्रवेशासह विक्रमाची बराेबरी साधली. ताे अाठव्यांदा फायनलमध्ये दाखल झाला. यातून त्याने टेनिसस्टार पीट सॅम्प्रास अाणि इवानच्या विक्रमाशी बराेबरी साधली.

  नदाल ग्रँडस्लॅममध्ये तिसऱ्यांदा रिटायर्ड हर्ट
  स्पेनच्या राफेल नदालला दुखापतीचा माेठा फटका बसला. त्याला करिअरमध्ये तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम सामन्यात माघार घ्यावी लागली. यापूर्वी त्याने २०१० च्या अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये मरेविरुद्ध अाणि २०१८ मध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये सिलीचविरुद्ध माघार घ्यावी लागली हाेती. अाता त्याचा उपांत्य फेरीचा सामना डेल पेत्राेशी हाेता.

Trending