आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे; आमिर खान याने व्यक्त केली चिंता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चित्रपटसृष्टीत काम करताना आहाराचे महत्त्व कधीच कळले नाही. गझनी चित्रपटाच्या वेळी माझी आहारतज्ज्ञाशी ओळख झाली आणि आहाराकडे बघण्याचा माझा दृष्टिकाेनच बदलला. ४० वर्षांनंतर मला कळलेले आहाराचे महत्त्व मी माझ्या मुलांना त्यांच्या १८ व्या वर्षात समजवून सांगत आहे. एकीकडे कुपाेषण आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांमधील लठ्ठपणा या दाेन्हीवर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक आहे.

 

चाइल्डओबेसिटी.कॉम' या संकेतस्थळाच्या माध्यमातून लठ्ठ मुले आणि त्यांच्या पालकांना याेग्य मार्गदर्शन मिळेल आणि वेळीच उपचार करणे शक्य हाेऊ शकेल, असा विश्वास अभिनेता आमिर खान याने व्यक्त केला आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या विकारावर जानजागृती तसेच उपाययाेजना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि लठ्ठपणा शल्यचिकित्सक डाॅ. अरुण बाेराडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'चाइल्डओबेसिटी.काॅम' या संकेतस्थळाचे अनावरण गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. 

आमिर म्हणाला, गझनी चित्रपटाच्या वेळी माझ्या शरीरात ३८ टक्के चरबीचे प्रमाण हाेते. हे प्रमाण कमी करून मी ९ टक्क्यांवर आणले. हे वजन मी अवघ्या ५ महिन्यांत कमी केले. वास्तविक हे सर्व झटपट केले, असेही त्याने या वेळी सांगितले. तसेच आपण या मुद्यावर लवकरच काम सुरू करणार असल्याचे त्याने सांगितले. 

 

मुले मैदानी खेळापासून लांब : गिरीश महाजन 
जागतिक आराेग्य संघटनेनुसार, ५ वर्षात २२ टक्के मुले लठ्ठपणाचे बळी ठरले. शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही हा विकार गंभीर रुप धारण करीत आहे. अभ्यासाच्या वाढलेल्या तासानंतर उरलेल्या वेळात माेबाइलवर तासन््तास खेळत बसल्याने मुलै मैदानी खेळापासून दूर चालली आहेत. खानपान तसेच जीवनशैलीतील बदल यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणातून हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबासारख्या विकारांना लहान वयातच निमंत्रण मिळत असल्याचे महाजन म्हणाले.