आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैगम इमामच्या चित्रपटात अमिताभ बनणार 'नकलची', लवकरच सुरु होणार काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमिताभ बच्चन प्रौढ शिक्षणावर आधारित 'रामचरण मैट्रिक पास' चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होती. आता दिग्दर्शक जैगम इमामने त्यांना याच विषयावर आधारित 'नकलची'साठी अॅप्रोच केले आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा अरोराचे प्रोडक्शन हाऊस क्रिअर्ज एंटरटेनमेंट करणार आहे.


आगामी प्रोजेक्ट
प्रेरणा अरोराचे प्रोडक्शन हाऊस क्रिअर्ज एंटरटेनमेंट गेल्यावर्षी वादात अडकले होते. आधी जॉन अब्राहम आणि नंतर भूषण कुमारने त्यांच्यावर पैशाच्या देण्याघेण्यावर आरोप लावले होते. त्यानंतर क्रिअर्ज एंटरटेनमेंट कंपनी आता चित्रपटाची निर्मिती करणार नसल्याचे एेकले होते. मात्र, आता तसे काही नाही. वाद मिटल्यानंतर प्रेरणा पुन्हा एकदा चित्रपटाच्या निर्मितीत लागली आहे. ती लवकरच नकलची चित्रपट घेऊन येणार आहे. त्याचे दिग्दर्शन 'अलिफ' आणि 'दोजख : इन सर्च ऑफ हैवेन' सारखे सामाजिक चित्रपट बनवणारे जैगम इमाम करणार आहेत. यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. इमामने याविषयी अमिताभ यांची भेट घेतली आहे. अमिताभ यांनीदेखील पटकथेत रस घेतला आहे. लवकरच त्यांना कथा दिली जाईल. यापूर्वी अमिताभ यांनी इमामच्या दोजखची प्रशंसा केली होती. इमामच्या दुसऱ्या 'अलिफ'मध्ये जया बच्चन कथाकाराच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाची कथा 75 वर्षांच्या ज्येष्ठ ननकू नारायणवर आधारित आहे. ननकूचे स्वप्न हायस्कूल परीक्षा पास होण्याचे असते. विशेष म्हणजे असेच कथानक असलेला 'रामचरण मैट्रिक पास'देखील अमिताभला ऑफर झाला आहे. जैगमच्या मते, 'माझा चित्रपट सामाजिक विषयाला प्रेरणा देणारा आहे. बऱ्याच काळापासून ते यावर काम करत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी कथानक निश्चित करून त्याची नोंदणी केली होती.' 

 

इमाम सांगतात... 
नकलची' साठी माझी पहिली पसंत अमिताभ बच्चनच होते. एका वर्षापूर्वीच मी त्यांना कथानक दाखवले होते, मात्र दुसऱ्या कामामुळे याचे काम निश्चित केले नव्हते. सध्या जैगम 'नक्काश'मध्ये व्यग्र आहेत. लवकरच तो रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...