आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता भोवली; मनपातील पंधरा कर्मचाऱ्यांवर कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात जागोजागी साचलेला कचरा अन् अस्वच्छता आरोग्य निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना चांगलीच भोवली. पालकमंत्री प्रवीण पाेटे यांच्या पाहणीनंतर चव्हाट्यावर आलेल्या अस्वच्छतेने सहा जणांचे निलंबन, आठ जणांना 'शो-कॉज' तर एकाची बदली करण्यात आली. शहर स्वच्छतेच्या गंभीर विषयावरून एकाच वेळी आरोग्य विभागातील तब्बल १५ कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेकडून शनिवारी (२२ सप्टेंबर) कारवाई करण्यात आली. 


कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ५ बीटप्युन, ६ आरोग्य निरीक्षक, ३ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तर एका लिपिकाचा समावेश आहे. कंपोस्ट डेपो येथील लिपीक गोपाल घुरडे यांची बदली करण्यात आली आहे. शहरात साचलेला कचरा आणि अस्वच्छतेची समस्या किती गंभीर आहे, हे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून निदर्शनास आणून दिले. रिकाम्या वाहनांच्या नोंदी दाखवून कचऱ्यातून मनपाची आर्थिक लूट करण्याचा प्रकार 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित करीत उघड केला. शिवाय अनेक दिवसांपर्यंत कचरा पडू राहत असल्याने सार्वजनिक आरोग्य डेंग्यूसह संसर्गजन्य तापाने धोक्यात आले होते. गत तीन महिन्यात तापाचे तब्बल ३ हजार ८९३ रुग्ण तर त्यापैकी तब्बल १५३० रुग्ण डेंग्यू संशियत असल्याने पालकमत्र्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर गुरूवार २० सप्टेंबरला 'सर्जिकल स्ट्राईक' केला. शहराच्या अनेक भागात अस्वच्छता आढळून आल्याने पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवाय दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने पालकमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेल्या भागातील बिटप्युन, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांची लांबलचक यादीच तयार केली. शहर स्वच्छतेच्या कामाच्या कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे आढळल्याने महानगरपालिका प्रशासनाकडून एकूण १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

 

अधिकारी रडारवर : शहरातील अस्वच्छतेच्या विषयाला घेऊन बिटप्युन, अारोग्य निरीक्षक तसेच वरिष्ठ अारोग्य निरीक्षक अशा एकूण १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता अधिकारी आयुक्तांच्या रडारवर असल्याची माहिती महानगरपालिकेतील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री पोटे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या शहरातील स्वच्छतेची पोलखोल मनपासह शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

आठ महिने दडलेला अहवाल येणार का बाहेर? 

रिकाम्या वाहनांच्या नोंदी करीत तिजोरीच्या लुटीचा पर्दाफाश करणारा कचऱ्याच्या अनागोंदीचा अहवाल आठ महिने दडविल्या गेला. समितीने शोधलेले बारा निष्कर्ष चौदा अभिप्रायाला केराची टोपली दाखवली. अायुक्त या अहवालावर काय भूमिका घेणार याकडेे लक्ष लागले आहे. 

आरोग्य निरीक्षकासह शो-कॉज दिलेले कर्मचारी 


प्रभाग पद कर्मचारी 
एक आरोग्य निरीक्षक श्रीकांत डवरे, 
झोन ५ वरिष्ठ आरोग्य निरी. आय. आर. खान 
झोन २ वरिष्ठ आरोग्य निरी. सिद्धार्थ गेडाम 
अंबापेठ आरोग्य निरीक्षक महेश पळसकर (कंत्राटी ) 
अंबापेठ बीटप्युन संजय वाघोळकर 
बडनेरा वरिष्ठ आरोग्य निरी. राजू डिक्क्याव 
१९ बीटप्युन नरेंद्र डुलगज 
१९ बीटप्युन सुनीता धवसेन 
मनपातील हे कर्मचारी झाले निलंबित 
प्रभाग पद कर्मचारी 
एक बीटप्युन विनोद खोडे 
चार आरोग्य निरीक्षक अजय घेंगर 
चार बिटप्युन संदीप सारसर 
साईनगर आरोग्य निरीक्षक नीलेश गाडे(कंत्राटी) 
कंपोस्ट डेपो आरोग्य निरीक्षक महेश उईके 
कंपोस्ट डेपो आरोग्य निरीक्षक किशोर संगेले 

 

बातम्या आणखी आहेत...