आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड्रॉइडची बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी वापरा या पद्धती; जाणून घ्या खास टिप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- आपला स्मार्टफोन आता एक बहुपयाेगी (मल्टिटास्कर) बनला आहे. कारण आपण त्यात फेसबुक चालवणे, गेम खेळणे, फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे, सर्च करणे आदी अनेक कामे करत असताे. मात्र, या सर्व कामांसाठी लिथियम-आयनची बॅटरी लाइफ पुरेशी ठरत नाही. याशिवाय मोबाइलमध्ये अनेक टूल्स वापरात नसले तरीही सुरूच असतात, ज्यामुळे  बॅटरी लवकर संपत असते. येथे काही टिप्स देत आहाेत, ज्यांच्या  मदतीने तुम्ही अँड्रॉइड फोनची बॅटरी दीर्घकाळ वापरण्यासह डेटा सेव्हदेखील करू शकता.

 

बॅकग्राउंड अॅप्सची मर्यादा निश्चित करा :

बॅकग्राउंडमध्ये असलेल्या मोबाइल अॅप्समुळे डेटा व बॅटरी दाेन्ही कमी हाेत असतात. विशेषत: इंटरनेटच्या वापरादरम्यान. त्यामुळे गरज नसेल तेव्हा नेटविना फोन वापरू शकता. साेबतच डेटा खर्च करणारे  अनावश्यक बॅकग्राउंड अॅप्स बंद करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रथम डेटा युसेज व त्यानंतर बॅकग्राउंड डेटावर क्लिक करून अॅप्सवरील डेटा टर्नऑफ करा.

 

प्ले स्टोअरचे ऑटो अपडेट बंद करा :

वाय-फायने कनेक्ट होताच फोनच्या सर्व अॅप्सना प्ले स्टोअर तुम्हाला न सांगता अपडेट करते. यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर संपते. असे हाेऊ नये म्हणून प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्वप्रथम मेन्यू, मग सेटिंग्ज व ऑटो अपडेटवर क्लिक करून नंतर ‘डू नॉट अपडेट’ नावाचे ऑप्शन सिलेक्ट करावे.

 

जीपीएस फंक्शन पूर्णपणे टर्नऑफ करा :

ही बॅटरी वाचवण्याची सर्वात उपयुक्त पद्धत आहे. अनेक युजर्स मोबाइलमध्ये जीपीएस किंवा नेव्हिगेशनला (जसे- गुगल मॅप्स) ऑन करून लोकेशन बंद करणे विसरतात. यामुळे अनेक अप्स तुमच्या लोकेशनचा वापर करत व परिणामी फोनची बॅटरी व डेटा अधिक प्रमाणात खर्च होते.

 

लाइट वेब अॅप्स स्विचऑन करा :

हे काेणत्याही ब्राऊझरमध्ये उपलब्ध अॅप्सचे स्लिम केलेले व्हर्जन व फोन-कम-पाॅवरचे असतात. यांच्यासाठी कंपन्या लाइट किंवा प्रोग्रेसिव्ह अॅंड्रॉइड वेब अॅप्स बनवत असतात. यामुळे बॅटरी कमी वापरली जाते.

बातम्या आणखी आहेत...