आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅपलने 5% महसूल कमी होण्याचा अंदाज वर्तवताच शेअर 10% घसरला, बाजार भांडवल पाच लाख कोटींनी घटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅनफ्रान्सिस्को- अॅपलने सीईओ टीम कुक यांनी डिसेंबर तिमाहीमध्ये विक्री कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २००७ मध्ये आयफोन लाँच झाल्यानंतर पहिल्यांदा कंपनीने निकालात महसुलात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चीनमधील विक्री कमी झाल्याने महसुलात ५.५ टक्के घट होण्याचा कंपनीचा अंदाज असल्याचे कुक यांनी सांगितले आहे. गुरुवारी अमेरिकी शेअर बाजारात उघडल्यानंतर १० मिनिटात नास्डॅकमध्ये अॅपलचे शेअर १० टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीचा मार्केट कॅप ५ लाख कोटी रुपयांनी कमी हाेऊन ४७.५ लाख कोटी रुपयांवर आला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये ही एक ट्रिलियन डॉलर (७० लाख कोटी रुपये) मूल्य असलेली जगातील पहिली कंपनी बनली होती. आता ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आली आहे. अॅपलने डिसेंबर तिमाहीमध्ये पहिले ८९-९३ अब्ज डॉलर (६.२-६.५ लाख कोटी रुपये) महसुलाचा अंदाज व्यक्त केला होता. कुक यांच्यानुसार हा ८४ अब्ज डॉलर (५.८ लाख कोटी रुपये) पर्यंत राहील. अॅपलच्या आर्थिक वर्षाची सुरुवात सप्टेंबरपासून होते. पहिली तिमाही २९ डिसेंबरला संपली आहे. ही २९ जानेवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करेल. कंपन्यांना स्वत:च्या हिशेबाने आर्थिक वर्ष ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. कुक यांनी गुंतवणूकदारांना एक पत्र लिहिले आहे. यात विकसनशील देशांतील अडचणींचा आम्हाला अंदाज होता असे त्यंानी म्हटले आहे. 

 

२०१८: ५ टेक कंपन्यांचे मूल्य ७० लाख कोटींनी घटले 
५ तंत्रज्ञान कंपन्या - फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स व गुगलचे मूल्य २०१८ च्या उंचांकी पातळीवरून ७० लाख कोटी रुपये कमी झाले. हे बीएसई मध्ये नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपच्या अर्धे आहे. 

 

अॅपलचा २०% महसूल चीनमधूनच येतो 
अॅपल निकालात चीन, हाँगकाँग व तैवानची आकडेवारी जारी करते. कंपनीचा २०% महसूल याच परिसरातून येतो. मार्च वर्षभरापासून अॅपल, आेप्पो आणि हुवावेच्या विक्रीत येथे वाढ झाली आहे. 

 

चीनमध्ये सॅमसंगची भागीदारी १ टक्क्यांवर 
चीन मध्ये २०१३ मध्ये सॅमसंगची बाजारातील भागीदारी १५ टक्के होती. गेल्या वर्षी ही भागीदारी केवळ एक टक्क्यांवर आली आहे. 

 

मागील वर्षी आयफोनची विक्री जगभरात फक्त १% वाढली 

संशोधन संस्था आयडीसीच्या विश्लेषक किरणजित कौर म्हणाल्या की, चीनमध्ये किमतीमुळे अनेक तिमाहींपासून अॅपलची कामगिरी खराब आहे. नवीन आयफोनचे दर १ हजार डॉलरवर आहेत. हा दर खूप आहे. २९ सप्टेंबर २०१८ मध्ये संपलेल्या वर्षात आयफोनची विक्री फक्त १% वाढली. पण फोन महाग असल्याने महसूल १८% वाढून ११.७ लाख कोटींवर गेला. 

 

नोव्हेंबरमध्ये आयफोनची विक्री कमी होण्याचा अंदाज होता 
नोव्हेंबरमध्ये सप्टेंबर तिमाहीचा निकाल घोषित करतेवेळी अॅपलने पुढील वेळी आयफोन व इतर उत्पादनांच्या विक्रीची संख्या सांगणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्याच वेळी आयफोनची विक्री घटेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अॅपलने नवीन फोन एक्स एस व एक्स एस प्लसची विक्रमी कमी झाल्याने पार्ट््स बनवणाऱ्या काही कंपन्यांना उत्पादन घटवण्याची सूचना दिली होती. त्या वेळी कुक यांनी ब्राझील, भारत आणि रशियात विक्री कमी राहण्याची शक्यता वर्तवली होती. चीन या श्रेणीत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

 

आयफोन-८ नंतर तंत्रज्ञानात अधिक बदल केला नाही 
अॅपलच्या महसुलात ५९% हिस्सा आयफोनचा असतो. विश्लेषकांनुसार, फोन तांत्रिकदृष्ट्या अपडेट असेल तरच लोक नवीन फोन घेतात. आयफोन-८ नंतर फोनमध्ये किमतीव्यतिरिक्त काही बदलले नाही. वन प्लस, ओप्पो, गुगल यापेक्षा कमी किमतीत उत्तम फीचरचे फोन देत आहेत. अॅपलने जून २००७ मध्ये आयफोन लाँच केले. २०१७ पर्यंत १०० कोटींवर आयफोन विकले.