आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे परिणीती अर्जुनची मैत्री, तर परिणीती म्हणते 'खऱ्या आयुष्यात मी खूप भावनिक मुलगी आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी 2012 मध्ये 'इशकजादे' चित्रपटाद्वारे सोबत करिअरला सुरुवात केली होती. दोघेही चांगले मित्र आहेत. लवकरच ते 'नमस्ते इंग्लंड' आणि "संदीप और पिंकी फरारalt39मध्ये दिसतील. या मुलाखतीमध्ये परिणीतीने अर्जुनसोबतची मैत्री आणि पडद्यावरील केमिस्ट्रीबरोबरच करिअरबाबतही सांगितले...

 

- तू आणि अर्जुन सहा वर्षांनंतर एकत्र येत आहात... 
अर्जुन नशीबवान आहे. कारण तो माझ्यासोबत काम करत आहे. 'इशकजादे'नंतर मला अनेक ऑफर्स आल्या होत्या, परंतु अर्जुनही त्या चित्रपटात असल्याचे कळताच मी त्यास नकार देत होते. आम्हाला काहीतरी स्पेशल हवे होते आणि 'नमस्ते इंग्लंड'मध्ये ते करायला मिळाले. सहा वर्षे कशी गेली कळालेच नाही. 


- तुझे चित्रपट 'मेरी प्यारी बिंदू' आणि 'हंसी तो फंसी' खास कमाई करू शकले नाही... 
या चित्रपटांची संकल्पना व्यावसायिक नव्हती. मी तेवढी ग्लॅमरस भूमिकाही केली नाही. या चित्रपटांमध्ये माझे पात्र अवश्य सक्षम होते. यामध्ये मला काहीतरी नवीन करायला मिळाले होते. 


- तू जिवंत पात्रांसाठी ओळखली जातेस, मग भावनिक दृश्य काही अडचणी आल्या नाहीत का? 
नाही, असे काहीही नाही. दोन्हीही प्रकारचे पात्र साकारताना अडचणी येतात. खरे म्हणजे अर्जुननेच मला अशा प्रकारच्या पात्रांसाठी प्रेरित केले आहे. त्यानंतरच मी अशाप्रकारच्या भूमिका साकारल्या. वस्तुत: मी तर खूप भावनिक मुलगी आहे. अशा प्रकारचे पात्र साकारायला मला आवडते. 


- ऑफ स्क्रीनही तुझी आणि अर्जुनची केमिस्ट्री चांगली आहे, याबाबत काय सांगशील? 
खरे सांगायचे यामुळे पडद्यावर काही परिणाम होतो, असे मला वाटत नाही. आम्ही नेहमी असेच राहतो. पडद्यावरील केमिस्ट्री आमच्या चांगल्या बॉन्डिंगमुळे दिसते. अर्जुन आणि मी चांगले मित्र असून वाढदिवसाला एकमेकांना बोलावतो. मात्र, एकमेकांची इच्छा राखण्याची औपचारिकता कधीच करत नाही. आम्ही दुनियादारी, आपापले आयुष्य आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा करतो आणि हसतो. तो कधीच मला जज करणार नाही, असे मला वाटते. 


- 'इशकजादे'पासून ते आतापर्यंत तू अर्जुनमध्ये कोणता बदल पाहिला? 
त्याच्याकडे नेहमीच चित्रपटाबाबत भरपूर माहिती असते. इंडस्ट्रीत निर्माते कसे काम करतात, हे त्याला माहीत आहे. तो दृश्यापासून ते स्क्रिप्टपर्यंत सर्व गोष्टींची माहिती घेतो. माझादेखील असाच प्रयत्न असते आणि त्याच्याकडून खूप काही शिकते. आता बस झाले. अर्जुनचे यापेक्षा जास्त कौतुक करायचे नाही. 

बातम्या आणखी आहेत...