आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकले का? 'पानिपत'साठी गोवारीकर सिद्धार्थ निगमला भेटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानसोबत 'धूम 3' मध्ये दिसलेला यंग अॅक्टर सिद्धार्थ निगमला दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने आपल्या आगामी 'पानिपत'चित्रपटासाठी अप्रोच केले आहे. १७ वर्षांचा सिद्धार्थ या चित्रपटात सदाशिवराव भाऊच्या बालपणाची भूमिका साकारू शकतो. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत भाऊने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. सूत्राच्या माहितीनुसारर.., सिद्धार्थने या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. त्याचा परफॉर्मन्स पाहून आशुतोष इंप्रेस झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षीच्या शेवटीपर्यंत सुरू होईल. सिद्धार्थकडे सध्या इतर बरेच चित्रपट आहेत, त्यामुळे तो हा चित्रपट शक्यतो करणार नाही, अशीदेखील चर्चा आहे. खरं तर, भाऊची भूमिका ऐतिहासिक आहे. यासाठी सिद्धार्थला आपले केस कापावे लागतील. मात्र, इतर चित्रपटासाठी तो असे करणार नाही. याविषयावर जेव्हा सिद्धार्थसोबत बोलणे झाले तेव्हा तो म्हणाला... हो, 'पानिपत'साठी मी आशुतोष सरांना भेटलो होतो. मात्र, अजून काहीच फायनल केले नाही.' त्यामुळे सिद्धार्थ यासाठी होकार देतो की नकार हे पाहण्याजोगे ठरेल. खरं तर, या चित्रपटात सदाशिवराव भाऊची भूमिका अर्जुन कपूर करणार आहे. ६ डिसेंबर २०१९ला प्रदर्शित होईल. 
चित्रपटात सदाशिव भाऊची भूमिका करू शकतो सिद्धार्थ. अजून झाली नाही अधिकृत घोषणा... 

बातम्या आणखी आहेत...