आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीच्या वर्षामध्ये बाजारामध्ये अस्थिरता राहते, अशात एसआयपी चांगला पर्याय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सार्वत्रिक निवडणुकीमुळे २०१९ हे वर्ष शेअर बाजारासाठी अस्थिर राहणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे मूल्य सध्या योग्य पातळीवर असल्याचे आम्हाला वाटते. सध्या शेअर स्वस्त नाही किंवा महागही नाही. अनेक शेअर तर सध्या आकर्षक मूल्यावर उपलब्ध आहेत. त्यामुळे लक्ष वैयक्तिक शेअरवरच असायला हवे. अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे बाजाराची धारणा सकारात्मक झालेली आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने चालू खाता आणि राजकोशीय दोन्हींतील घाटा वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. रुपया ७४ च्या पातळीवरून मजबूत होऊन ७० च्या जवळपास आला आहे. बाँड यील्डमध्ये सुधारणा झाल्याने अर्थ व्यवस्थेवर व्याजदराचा दबाव कमी झाला आहे. आर्थिक आकडे स्थिरतेचे संकेत देत आहेत. 

 

अल्प मुदतीपासून ते मध्यम मुदतीपर्यंत पाहिल्यास शेअर बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. इतिहास पाहिल्यास निवडणुकीच्या वर्षात बाजारात अस्थिरता दिसून येते. मागील निवडणुकीचा काळ पाहिल्यास २००४, २००९ आणि २०१४ मध्ये बाजाराने गुंतवणूकदारांना अनेकदा पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. अशा परिस्थितीत शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला पर्याय पद्धतशीर गुंतवणूक योजना (एसआयपी)असते. २०१९ मध्येही एसआयपीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळू शकते. सामान्यपणे निवडणुकीनंतर बाजारात तेजीचे वातावरण असते. त्यामुळे बाजारात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. अलीकडच्या वर्षांचा विचार केल्यास असे वातावरण २०१० ते २०१३ दरम्यान दिसून आले होते. त्या वेळी बाजाराची स्थिती मर्यादित होती. ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कायम ठेवली त्यांना २०१४-१७ दरम्यान तेजीच्या वातावरणात चांगला परतावा मिळाला. 
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयावर ठेवा लक्ष : गुंतवणूकदारांनी अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह वर लक्ष ठेवायला हवे. अमेरिकेमध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्यता संपेल, त्यानंतर भारतीय बाजारात चांगली तेजी दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाजारातील गुंतवणुकीचा वेळही संपलेला असेल. म्हणजेच त्याच्या आधीच गुंतवणुकीच्या संधी मिळतील. 

 

नवीन एसआयपी सुरू करू शकतात : 
आमच्या मते सध्याचे वातावरण गुंतवणूकदारांसाठी चांगले आहे. त्यांनी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि व्हॅल्यू फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक कायम ठेवायला हवी. ज्या गुंतवणूकदारांकडे एसआयपी नाही तेदेखील त्याची सुरुवात करू शकतात. 

 

एकगठ्ठा गुंतवणुकीसाठी बॅलन्स्ड फंड चांगला : 
ज्या गुंतवणूकदारांना एकगठ्ठा गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड आणि इक्विटी सेव्हिंग फंड चांगले माध्यम ठरू शकते. अशा परिस्थितीत फंड मॅनेजर योजनेतील पैसा इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे बाजारात घसरण होत असेल आणि अस्थिरतेच्या वातावरणातही गुंतवणुकीचा एक भाग सुरक्षित राहतो. 

 

कमी कालावधीचे डेट फंडही चांगले : 
ज्या गुंतवणूकदारांना डेट फंडात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी आमचा डायनॅमिक ड्युरेशन योजना निवडण्याचा सल्ला असेल. यात अस्थिरतेच्या वातावरणातही फायदा मिळू शकतो. कमी कालावधीसाठी फंड आणि एक्रुअल योजनेसंदर्भातही आमचे मत सकारात्मक आहे. कमी कालावधीचे फंड सामान्यपणे १ ते ३ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी असलेल्या

इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करतात.