आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचऱ्यावर उपकराचा प्रस्ताव येत्या मनपा सभेत, निवासी मालमत्तांना एक रुपया दररोज आकारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नागरिकांच्या घरातून कचरा संकलन व वाहतुकीसाठी खासगी संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा खर्चही नागरिकांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यानुसार निवासी मालमत्तांना एक रुपया, व्यावसायिक दोन तर मोठ्या प्रतिष्ठानांकडून दहा रुपये दररोज याप्रमाणे स्वच्छता उपकर आकारण्यात येणार आहे. मात्र, ज्या सोसायटी, गृहनिर्माण संस्था कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावतील त्यांना वाढीव करातून सूट दिली जाईल, तसा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी दिली.

 

इंदूर शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी निवासी मालमत्तांकडून प्रत्येकी दोन रुपये उपकर घेण्यात येतो. त्याच धर्तीवर शहरातील नागरिकांनाही तो कर भरावा लागणार आहे. शासनाने कचराकोंडीनंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी ९१ कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कचऱ्याचे संकलन व वाहतुकीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एजन्सी अंतिम झाल्यानंतर नागरिकांना अतिरिक्त कर लागेल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भांबे यांनी सांगितले.

 

३५० जणांना दंड
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ३५० जणांकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. एकाच पथकाला प्लास्टिक बंदी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, शहर विद्रूपीकरण कारवाई आदी कामे सोपवल्याने प्लास्टिक बंदी मोहीम बंद पडल्यात जमा असल्याने शहरात सर्रास प्लास्टिक विक्री सुरू आहे.

 

सर्वेक्षण फेब्रुवारीत
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात कचराकोंडी असतानाही मनपाचा गुणानुक्रम वाढला होता. पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा सर्वेक्षण होईल.

 

बातम्या आणखी आहेत...