आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताच्या छबीचा कंटाळा आला; बिग बॉस कंटेस्टेंट अनूप जलोटांकडून दोन वर्षांपूर्वीच भावना व्यक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसच्या १२ व्या हंगामात आपल्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीन मथारूसोबत लिव्ह-इन संबंधाचा खुलासा केल्यानंतर 'भजन सम्राट' काहींच्या निशाण्यावर आले असतील, मात्र त्यांनी दोन वर्षांपूर्वीच एका मुलाखतीत संताच्या छबीचा कंटाळा आल्याचे म्हटले होते. मला वाइन चांगली वाटते व मला ढोंग्यासारखे आयुष्य जगण्यावर विश्वास नाही. 


सत्यसाईचे परमभक्त 
अनुप जलोटा सात वर्षांचे होते तेव्हा ते पहिल्यांदा लखनऊमध्ये सत्यसाई बाबांना भेटले. त्यानंतर त्यांनी ते सतत संपर्कात राहिले. जलोटा दरवर्षी बाबांना भेटण्यासाठी पुट्टपर्थी जात होते. यासाठीच त्यांनी अभिनयाच्या करिअरची सुरुवात सत्य साई बाबा चित्रपटात सत्य साईच्या व्यक्तिरेखेतून केली. त्याआधी मनोजकुमारचा चित्रपट 'शिरडी के साई बाबा' जलोटा यांनी जे गाणे गायले त्यासाठी स्वत: सत्य साईंनी मनोज कुमारला तसे सांगितले हेाते.


गाण्याचे पैसे घेतले नाही 
सन १९८१ मधील इक दुजे के लिए चित्रपटातील प्रसिद्ध गीत- सोलह बरस की बाली उमर को सलाम। लता मंगेशकरांनी गायलेल्या या गाण्याच्या सुरुवातीच्या दोन ओळी : 'कोशिश करके देख लें दिया सारे नदियां सारी। दिल की बुझती,बुझती है हर चिंगारी।' यासाठी दिग्दर्शकाने जलोटांना काय घेणार, अशी विचारणा केली तेव्हा संगीत क्षेत्रात नाव झालेले जलोटा बरेच मानधन मागू शकले असते, मात्र ते एवढेच म्हणाले, एवढ्या सुंदर गाण्यातील एवढ्या सुंदर ओळी गायला देता आणि परत विचारता काय घेणार? मी यासाठी काहीही घेणार नाही. 


जन्म : २९ जुलै १९५३ (६५ वर्षे) 
पुरस्कार : २६ जानेवारी २०१२ ला पद्मश्री. संगीत-नाटक अकादमीसह अन्य मान-सन्मान. 
चर्चेत का? : स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीन मथारूसोबतच्या संबंधांमुळे.याचा खुलासा टीव्ही शो बिग बॉसमध्ये झाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...