आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये 4 वर्षांपासून शिक्षकाविना शिक्षण घेताहेत 11 वी व 12 वीचे विद्यार्थी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखपुरा- बिहारच्या शेखपुरा येथे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली सरकारी शाळा. येथील ११ वी व १२वीतील मुले शिक्षकाविना अभ्यास करत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिक्षक उपलब्ध नाहीत. तरीही स्वत: अभ्यास करून परीक्षाही देत आहेत, चांगल्या मार्कांनी पासही होत आहेत. शेखपुरा ब्लॉकमधील बरैयाबिघा-कोसुम्भा उच्च माध्यमिक शाळेतील हे वर्णन आहे.

 

कोसुम्भा मध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधांशू यांनी एक महिन्यापूर्वीच या शाळेचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी सांगितले, या शाळेतील दहावीतील मुलांनी ११ वीसाठी प्रवेश घेतला. पण शिकवण्यास शिक्षक नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो आहे. मध्य विद्यालयात शिक्षकांची कमतरता आहे. ११ वी व १२ वी साठी शिक्षक नसले तरी विद्यार्थी संख्येवर परिणाम झालेला नाही. २०१४ मध्ये ९ वीच्या वर्गात २३३ मुलांनी प्रवेश घेतला आहे.