आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या यात्रेत बॅनर महिला आयोगाचा, उपस्थिती बचत गटांची, प्रसिद्धी योजनांची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील साडेतीन शक्तिपीठे व इतिहासकालीन स्त्रियांच्या जन्मस्थानांची प्रेरणापीठे असा २५ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या नवरात्रोत्सव यात्रेला नाशकातून सुरुवात झाली. मात्र, भाजपच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवली. देवळा तालुक्यातील महिला मेळाव्यात आमदार राहुल आहेर व खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी हजेरी लावली. मात्र, यात्रेचे मूळ स्वरूप व प्रत्यक्ष कार्यक्रमातील विरोधाभासामुळे तेथील विसंवादही उघड झाला. 


'पहिली माळ भूमातेला, शेतकऱ्यांच्या सन्मानाची' भूमिकेतून महिला मेळाव्याने यात्रेची सुरुवात होणार होती. प्रत्यक्षात गिरजा मंगल कार्यालयातील या मेळाव्यात महिला आयोगाचा मुख्य फलक लावला होता. उपस्थितांत शेतकरी कमी व बचत गटाच्या सदस्या अधिक असे चित्र होते. मेळावा सुरू होताच 'नवरात्रोत्सव २०१८'चा अर्धवट फलक आणून उभारण्यात आला. काही महिलांचे सत्कार एवढाच मूळ नियोजनातील भाग या वेळी प्रत्यक्षात दिसला. बाकी पंतप्रधानांच्या उज्ज्वला योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींना गॅस शेगड्यांचे वाटप करून या मेळाव्याची सांगता झाली. 


केवळ तक्रारींचा पाऊस 
मेळावा संपल्यावर, शासनाच्या योजनांचा लाभ झालेल्या महिलांनी व्यासपीठाजवळ येण्याची उद्घोषणा झाल्यावर, प्रत्यक्षात अर्ज केले, पण घरकुल मिळाले नाही, अर्ज केला पण गॅस कनेक्शन मिळाले नाही, कनेक्शन मिळाले, पण दोन वर्षांपासून संपलेला सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत या तक्रारी घेऊन महिलांनी गर्दी केली. 

बातम्या आणखी आहेत...