आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत प्रथमच : शेवटच्या 2 महिन्यांत 5 मोठे चित्रपट, बॉलीवूडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर अत्यंत विशेष राहतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडसाठी पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रेक्षकांना यादरम्यान पाच मोठे चित्रपट पाहावयास मिळतील. शेवटच्या दोन महिन्यांत एवढे मोठे चित्रपट येत असल्याची ही गेल्या १० वर्षांतील पहिलीच वेळ आहे. ठग्ज ऑफ हिंदुस्तान, झीरो, सिंबा, टोटल धमाल आणि २.० यांसारख्या पाच चित्रपटांवरच बॉलीवूडची ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पणाला लागली आहे. त्यात मोठे स्टार तर आहेतच, शिवाय हे या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटही आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. ठग्ज ऑफ हिंदुस्तानमध्ये स्वातंत्र्यापूर्वीची कथा आहे, तर झीरोमध्ये शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. टोटल धमाल आणि सिंबा हे विनोदी चित्रपट आहेत, तर २.० मध्ये तंत्रज्ञानाचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे. 

 

पाच मोठे चित्रपट : काहींत मोठे स्टार, तर काहींचे बजेट मोठे 


 ठग्ज ऑफ हिंदुस्तान 
स्टार- अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ. 
प्रदर्शन- ८ नोव्हेंबर २०१८ 
बजेट- Rs.३०० कोटी वैशिष्ट्य - या चित्रपटाची कथा ब्रिटिश काळातील आहे. त्याला प्रदीर्घ हॉलीडे वीकेंड मिळेल. पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन एका चित्रपटात एकत्र येत आहेत. 

 

 २.० 
स्टार- रजनीकांत, अक्षयकुमार, अॅमी जॅक्सन. 
प्रदर्शन- २९ नोव्हेंबर २०१८ 
बजेट- Rs.४०० प्लस कोटी 
वैशिष्ट्य - अक्षयकुमार या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत आहे. रजनीकांतचा अभिनय आणि ए. आर. रहमानचे संगीत विशेष आहे. पोस्ट प्रॉडक्शनवर निर्माता-दिग्दर्शक यांनी खूप काम केले आहे. 

 

 टोटल धमाल 
स्टार- अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित. 
प्रदर्शन- ७ डिसेंबर २०१८. 
बजेट- Rs.७० कोटी 
वैशिष्ट्य - धमाल सिरीजचे दोन चित्रपट हिट होते. प्रदीर्घ काळानंतर माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर एकत्र आले आहेत. अजय देवगणची कॉमेडी प्रेक्षकांना आवडते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...