आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटिश कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे 3 दिवसांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटिश कंपन्यांतील मोठ्या अधिकाऱ्यांचे तीन दिवसांचे वेतन इतर लहान कर्मचाऱ्यांंच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे. ही माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.

 

या अहवालात म्हटले आहे की, कंपनीतील बॉस, बडे अधिकारी व छोट्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी काढण्यात आली. फूटसीमध्ये नोंदणीकृत १०० कंपन्यांच्या सीईओंचे वेतन ३.९ मिलियन पाऊंड (सुमारे ३४ कोटी ४१ लाख रुपये), तर छोट्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार सरासरी २९ हजार ५७४ पाऊंड (२६ लाख ९ हजार रुपये)आहे. तशात एक जानेवारी ते ४ जानेवारीदरम्यान एक वाजेपर्यंत काही सीईओंनी वार्षिक वेतनाइतकेच पैसे कमावले आहेत. हाय पे सेंटरचे संचालक निदेश ल्यूक हिल्डयार्ड यांनी संशोधन केले आहे.