आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅथे पॅसिफिकने 11 लाखांची तिकिटे प्रवाशांना विकली फक्त 48 हजारांत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनोई- कॅथे पॅसिफिक एअरलाइनने चुकून फर्स्ट व बिझनेस क्लासची आसने खूप स्वस्तात विकली. बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना ११.२ (१६ हजार डॉलर)लाखांची तिकिटे फक्त ४७ हजारांत मिळाली. एअरलाइन कंपनीने म्हटले, व्हिएतनामहून कॅनडा व अमेरिकेचे बिझनेस क्लासचे तिकीट इकॉनॉमी क्लासच्या तिकीट दरापेक्षाही कमी दरात घेतले, अशा प्रवाशांचे आम्ही स्वागत करू, असे म्हटले आहे. कॅथे पॅसिफिक एअरलाइनने टि्वटरमध्ये म्हटले, २०१९ नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी नव्या वर्षात आमचे खूप चांगले सरप्राइज पॅकेज विकत घेतले आहे. या वर्षी तुमच्यासाठी आमच्याकडून खास भेट देण्यात आली आहे. 

 

३१ डिसेंबर रोजी ट्रॅव्हल्स एजन्सीज साइटवर प्रवासी भाडे खूप कमी दाखवण्यात आले होते. नंतर यात सुधारणा करण्यात आली. किती रकमेत तिकिटाची विक्री झाली, याचा तपशील मात्र कंपनीने जाहीर केलेला नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीला एअरलाइन्सची चूक खूप आव्हानात्मक आहे. कारण कंपनीने मार्च -२०१८ मध्ये नुकसान दर्शवले होते.