आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआय म्हणते, अस्थाना चालवायचे लाचखोरीचे रॅकेट; वर्मांकडून भ्रष्टाचाऱ्यांचा बचाव : अस्थाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा अर्थात सीबीआयमधील वाद आणखीच चिघळू लागला आहे. संचालक आलोक वर्मा व उपसंचालक राकेश अस्थाना यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या परत घेऊन त्यांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांतील या वादाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली होती. तेव्हापासून दोघे परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले आहेत. 

अस्थाना यांच्या सीबीआयमधील पदोन्नतीवरील निर्णयासाठी झालेल्या सीव्हीसीच्या बैठकीत वर्मांनी पदोन्नतीला विरोध केला होता. त्यानंतर अस्थाना यांनी संचालक वर्मा यांच्याविरोधात मोर्चा सुरू केला. त्यांनी वर्मा व त्यांच्या निकटवर्तीयांवर १० हून जास्त प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी करत असलेल्या तपासात वर्मा हस्तक्षेप करत आहेत. माझा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित आयआरसीटीसी घोटाळ्यातील छाप्याची कारवाई त्यांनी रोखली. २ जी घोटाळ्यातील आरोपीस सेंट किट्सचे नागरिकत्व घेण्यापासून रोखले नाही. सतीश सनाला दिलासा देण्यासाठी दोन कोटी रुपयेही दिले, असे आरोप अस्थाना यांनी केले. 

 

अस्थाना यांच्या तक्रारीस केंद्राने सीव्हीसीला पाठवले होते. त्यानंतर ११ व १४ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून सीबीआयकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व फायली मागवल्या होत्या. सीव्हीसीला दिलेल्या उत्तरात सीबीआयने अस्थाना यांच्या तक्रारीला दुर्दैवी असल्याचे संबोधले होते. 
त्याचबरोबर अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी असे केले जात आहे. कारण अर्धा डझन प्रकरणांत त्यांच्या भूमिकेचा तपास केला जात आहे. सीबीआयने मंगळवारी कनिष्ठ न्यायालयात सुनावणीदरम्यान दावा केला की, अस्थाना संस्थेत लाचखोरीचे रॅकेट चालवत होते. 

 

राकेश अस्थाना : २०१४ मध्ये दिल्लीत अाले २० अधिकारी, त्यात समावेश 
१९८४ च्या बॅचचे अायपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे मूळचे झारखंडच्या रांची येथील अाहेत. केंद्रात माेदी सरकार अाल्यानंतर गुजरात केडरमधून अस्थानांसह २० अधिकाऱ्यांना दिल्लीत बाेलावले गेले. अस्थानांनी गाेध्रा कांड, चारा घाेटाळा, अहमदाबाद बाॅम्बस्फाेट, अासाराम या प्रकरणांचा तपास केला. लालूप्रसाद यादवांची सतत सहा तास चाैकशी केल्याने ते सर्वात जास्त चर्चेत अाले. 

 

देवेंद्र: सीबीअायमध्ये डीएसपीला केली अटक 
देवेंद्रकुमार हे सीबीअायमध्ये डीएसपी अाहेत. मात्र, त्यांना सीबीअायने अटक केली असून न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली अाहे. ते माेईन कुरेशीशी संबंधित प्रकरणात तपासाधिकारी हाेते. 

 

सतीश सना: हैदराबादचा उद्याेगपती, मुख्य अाराेपी 
सतीशबाबू सना हा हैदराबादचा उद्याेगपती हाेता. ताे पूर्वी सरकारी नाेकरी करायचा. सीबीअायच्या चाैकशीतून वाचण्यासाठी २०१७ पासून अातापर्यंत मी अस्थाना यांना सुमारे ५ काेटी दिले, असा सनाचा अाराेप अाहे. 

 

आलोक वर्मा : प्रत्यक्ष काम न केलेले पहिले सीबीअायप्रमुख 
अालाेक वर्मा हे २२ व्या वर्षी १९७९ मध्ये अायपीएस बनले हाेते. त्यांना एजी-एमयूटी (अरुणाचल, गाेवा, मिझाेराम, केंद्रशासित प्रदेश) केडर दिले गेले हाेते. ते त्यांच्या बॅचमधील सर्वात कमी वयाचे अधिकारी हाेते. ते मूळचे बिहारमधील रहिवासी अाहेत. त्यांनी दिल्ली पाेलिस अायुक्त म्हणूनही काम पाहिले. वर्मा हे सीबीअायचे असे एकमेव संचालक अाहेत, ज्यांना संस्थेत काम न करता थेट नियुक्त केले गेले हाेते. 

 

मनोज व सोमेश: दाेन्ही भाऊ सर्वात माेठे दलाल 
मनाेज दुबईत काम करणारा दलाल असून त्याला सीबीअायने अटक केलीय. त्याला बँकरही संबाेधले जाते. मनाेजचा त्याच्या भाऊ साेमेशसाेबत अनेक व्यवसायांत सहभाग अाहे. दाेघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी अाहेत. 

 

नागेश्वर राव : अाेडिशा केडरचे; प्रथमच केला डीएनए फिंगरप्रिंटचा वापर 
१९८६ च्या बॅचचे अायपीएस अधिकारी असलेले नागेश्वर राव यांना सीबीअायचे अंतरिम संचालक नियुक्त केले गेले अाहे. ते मूळचे तेलंगणातील असून अाेडिशा केडरचे अाहेत. राव यांनी गुन्हे शाखेचे पाेलिस अधीक्षक म्हणूनही काम पाहिलेय. ते अाेडिशाचे असे प्रथम अधिकारी हाेते, ज्यांनी १९९६ मध्ये एका बलात्कार प्रकरणाच्या तपासात डीएनए फिंगरप्रिंटचा वापर केला. राव यांची भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत चाैकशी सुरू अाहे. 

 

मोईन कुरेशी : आरोपीचे नाव सिन्हांच्या डायरीत हाेते 
२०१४ मध्ये माजी सीबीअायप्रमुख रणजित सिन्हांच्या घरी एक डायरी मिळून अाली हाेती. त्यातून सिन्हा व मांस व्यापारी माेईन कुरेशीची ७० वेळा भेट झाल्याचे समाेर अाले हाेते. कुरेशीविरुद्ध अनेक एफअायअार. 

 

बातम्या आणखी आहेत...