आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन खेळाडू पुजाराला म्हणाले, बाद हाे नाहीतर व्हीलचेअर मागवू...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- पुजारा जेव्हा ४ वर्षांचा हाेता, तेव्हा रबरच्या बाॅल आणि बॅटने खेळत हाेता. त्याच्या वडिलांनी त्याचा फाेटाे काढला. जेव्हा हा फाेटाे डेव्हलप होऊन आला, तेव्हा वडिलांनी चेतेश्वर म्हणजे चिंटूमधील गुणवत्ता ओळखली. त्याचे वडील अरविंद पुजारा हे रणजीत खेळले हाेते. काका बिपिन साैराष्ट्राकडून रणजी खेळाडू हाेता. चेतेश्वरचे आजाेबा शिवलाल पुजारा लेग स्पिनर हाेते. ते प्रिन्स्ली स्टेट ऑफ ध्रांगधरासाठी खेळत हाेते. पुजारामधील गुणवत्ता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला प्रशिक्षण देणे सुरू केले. 

 

पुजारा आपल्या यशाचे श्रेय वडील अरविंद यांना देतात. राजकाेटमध्ये राहणारे अरविंद रेल्वेत नाेकरी करत हाेते. राजकाेटमध्ये पुजारास खेळण्याच्या संधी कमी मिळत हाेती. वर्षभरात तेथे २० सामने खेळत हाेता. त्यामुळे तीन वर्षे तीन-तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी वडील मुंबईला घेऊन जात हाेते. मध्यमवर्गीय परिवारास मुंबईत राहणे अवघड हाेते, त्यामुळे एका नवीन हाेत असलेल्या इमारतीत त्यांचा परिवार राहत हाेता. अंडर-१४ च्या संघात निवड झाल्यानंतर पुजाराने २०००-२००१ मध्ये सौराष्ट्राकडून खेळताना ३०६ धावा केल्या. त्यानंतर ताे चर्चेत आला. एका मुलाखतीत पुजारा म्हणाला की, हाेळी-दिवाळीसारखे सणसुद्धा त्याने सामान्य व्यक्तींसारखे साजरे केले नाहीत.  

 

पुजारा आपली आई रीना पुजाराच्या खूप जवळ हाेता. २००५ मध्ये कर्करोगामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्यांनी पुजारासाठी नियम बनवला हाेता, प्रत्येक सामन्यानंतर एक ग्लास नारळपाणी पिणे गरजेचे.. पुजारा आजसुद्धा त्या नियमाचे पालन करताेे. पुजारा माेफत क्रिकेट अकॅडमी चालवताे. आपल्या उत्पन्नाचे २५ लाख दरवर्षी अकॅडमीसाठी देताे. 

 

चेतेश्वर पुजाराचे वडील व काेच अरविंद त्याच्या टेक्निकबाबत नेहमी सजग राहत हाेते. त्यामुळे जीवनात कधीही टेनिस बाॅलने खेळू दिले नाही. कारण सीझन बॉल व टेनिस बॉलचा बाउन्स वेगवेगळा असताे. त्यामुळे टेक्निकवर परिणाम हाेऊ शकताे. जेव्हा पुजारा ४ वर्षांचा हाेता, तेव्हा त्याचे वडील ५०-६० बाॅल सकाळी व सायंकाळी टाकत हाेतेे. शरीराच्या वरच्या भागात दुखापत हाेऊ नये म्हणून बॉलिंग अंडरआर्म करत हाेते. पुजारा ऑलराउंडर हाेता, परंतु कर्षण घावरी यांनी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.