आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर मागासवर्गासह अनुसूचित जाती, जमाती एकत्र आल्यास इतर समाजाची दांडी गुल; भुजबळ यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारे अनुसूचित जाती आणि जमाती तसेच इतर मागासवर्गात मोडणारे सर्व समाज एकत्र आले तर इतर सर्व समाजांची दांडी गुल होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भुजबळांनी समता परिषद या संघटनेच्या कामाला दिलेला वेग पाहता भुजबळांचे हे वक्तव्य म्हणजे आगामी काळात ओबीसींसोबतच अनुसूचित जाती आणि जमातींना सोबत घेऊन राजकीय मोट बांधण्याचे संकेत मानले जात आहेत. 


मुंबईत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात भुजबळांनी संविधानाचे ओबीसींच्या आयुष्यात असलेले महत्त्व अधोरेखित केले. जगात भारतानंतर नव्याने जे देश स्वतंत्र झाले, त्यापैकी बहुतांश देश हे आपले संविधान तयार करताना भारताच्या संविधानातील तरतुदींचा आधार घेत आहेत. भारताच्या संविधानात असलेल्या तरतुदींद्वारे सर्वांना समान अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे कायम दुर्लक्षित असलेल्या समाजाला मूळ प्रवाहात येणे शक्य झाले. म्हणूनच ओबीसी समाज घटकाच्या अस्तित्वासाठी संविधान वाचले पाहिजे, असेही ते म्हणाले. 


जातनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न 
जातनिहाय जनगणना व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. कारण राज्यात ५२ टक्के ओबीसी असूनही फक्त २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे. ओबीसींची नेमकी संख्या किती याची निश्चित आकडेवारी नसल्याने अनेक शासकीय लाभांपासून आपल्याला वंचित राहावे लागत असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमात रासपचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकरही उपस्थित होते. इतर मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा मिळावा, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 

बातम्या आणखी आहेत...