चीनमधील टांका गाव, / चीनमधील टांका गाव, जिथे 2200 घरे समुद्रात, 1300 वर्षांपूर्वी तत्कालीन शासकावर नाराज मच्छीमारांनी नौकेवर उभारली वसाहत

दिव्य मराठी वेब टीम

Oct 02,2018 08:18:00 AM IST

बीजिंग - चीनमधील फुजियान राज्याच्या निंगडे शहराजवळ एक टांका वस्ती (टांका गाव) अाहे. ही वसाहती पूर्णपणे समुद्रात उभी अाहे. येथे 2200 हून अधिक घरे नाैकेवर साकारली अाहेत. सुमारे 8000 लाेक त्यावर राहतात. जगातील ही अशी वसाहत अाहे जी पूर्णपणे समुद्रात वसलेली अाहे. हे मच्छीमार लाेक अाहेत. टांका जमात म्हणूनही त्यांची अाेळख अाहे. 1300 वर्षांपूर्वी तत्कालीन शासकाला त्रस्त होऊन या लाेकांनी इथे वस्ती केली हाेती, आता त्यांचे वारसही इथेच राहतात. मच्छीमारी हाच त्यांचा व्यवसाय. त्यांनी तरंगत्या घरांसमाेर माेठमाेठे प्लॅटफाॅर्मही तयार केले अाहेत, जिथे या लाेकांची मुले खेळतात, कार्यक्रमही हाेतात.

टांका जमातीचे सुमारे 800 लाेक वसाहतीत राहतात
700 इसवी सनामध्ये तेव्हाच्या राजाच्या जाचाला कंटाळून या जागेचा लाेकांनी अाश्रय घेतला
चीनमध्ये 700 इसवी सनामध्ये तांग राजाची सत्ता हाेती. टांका समूहाचे लाेक त्याच्या छळामुळे त्रस्त झाले हाेते. हा त्रास सहन न झाल्यामुळे अखेर या लाेकांनी समुद्रातच घरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी समुद्रात नाैकांवर घरे उभारून अापली वसाहत निर्माण केली. तेव्हापासून या लाेकांना 'जिप्सीज ऑन द सी' असे म्हटले जाते. या जमातीचे लाेक क्वचितच जमिनीवर असतात.


सरकारच्या प्राेत्साहनामुळे अाता समुद्रकिनारी उभारली घरे
चीनमध्ये कम्युनिस्टांचा राजवट येईपर्यंत हे लाेक समुद्रकिनारीही येत नव्हते. गावातील लाेकांशी राेटी-बेटी व्यवहारही नव्हता. काही वर्षांपूर्वी स्थानिक सरकारने प्राेत्साहन दिले, मग या लाेकांनी समुद्रकिनारी घरे उभारली. मात्र, नाैकांवरील घरांतच अजूनही राहतात.

X
COMMENT