आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यातील लॉटरीमुळे जोडप्याने जिंकले 12 कोटी: करकपातीनंतर मिळणार ९ कोटी रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील लुइसियाना येथील एका दांपत्यास कचऱ्यात सापडलेल्या लॉटरी तिकिटाने तब्बल १.८ मिलियन डॉलर (१२.६८ कोटी रु.) मिळवून दिले आहेत. करकपात होऊन त्यांच्या हातात  १.२७ मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळेल. हेराॅल्ड व टीना यांनी सांगितले, आम्ही ६ जून २०१८ रोजी लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. ते सांभाळूनही ठेवले. मात्र, लॉटरीचे क्रमांक जाहीर झाले तेव्हा खूप शोधूनही लॉटरीचे तिकीट सापडले नाही.

 

या तिकिटास बक्षीस मिळाले होते, याची त्यांना कल्पनाही नव्हती. एकदा त्यांनी घराची साफसफाई केली. तेव्हा त्यांना कचऱ्यात लॉटरीची अनेक तिकिटे सापडली. टीनाने सर्व तिकिटांचे क्रमांक वेबसाइटवर तपासले. तेव्हा एका तिकिटास बक्षीस लागले होते. नियमानुसार लॉटरीच्या घोषणेनंतर १८० दिवसांत  त्यांनी दावा केला. 

बातम्या आणखी आहेत...