आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या कसाेटीसाठी भारताचे तिन्ही सलामीवीर बाहेर; मयंक-हनुमाला संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- टीम इंडियाने दाैऱ्यात यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्धची कसाेटी मालिका जिंकण्यासाठी संघात पृथ्वी शाॅ, लाेकेश राहुल अाणि मुरली विजय या युवा प्रतिभावंत फलंदाजांची सलामीवीराच्या रूपात निवड केली हाेती. मात्र, मालिकेपूर्वीच युवा सलामीवीर पृथ्वी शाॅ जायबंदी झाला. त्यामुळे त्याला या मालिकेतून न खेळताच बाहेर पडावे लागले. दुसरीकडे सातत्याच्या सुमार खेळीमुळे मुरली विजय अाणि लाेकेश राहुलला तिसऱ्या कसाेटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात अालेे. त्यामुळे तिसऱ्या कसाेटीत अाता सलामी देण्याची संधी युवा फलंदाज मयंक अग्रवाल अाणि फाॅर्मात असलेल्या हनुमा विहारीला मिळणार अाहे.  

 

अाज बुधवारपासून भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या अाणि बाॅक्सिंग डे कसाेटीला मेलबर्नमध्ये सुरुवात हाेईल. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे अाता तिसऱ्या कसाेटीत बाजी मारून मालिकेत अाघाडी घेण्यासाठी दाेन्ही संघ उत्सुक अाहेत.  तिसऱ्या कसाेटीच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाच्या प्लेंइग इलेव्हनमधील खेळाडूंच्या नावाची घाेषणा करण्यात अाली.   

 

भारताचे येथे दाेन विजय : 
भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर अातापर्यंत १२ कसाेटी सामने झाले. यातील अाठ कसाेटीमध्ये अाॅस्ट्रेलियाने विजयाची नाेंद केली. तर, भारताला दाेन कसाेटीत विजयश्री खेचून अाणता अाली. यातील दाेन कसाेटी सामने अनिर्णीत राहिले. 

 

राेहितची सहाव्या स्थानी फलंदाजी
अाता पूर्णपणे फिट झालेल्या राेहितला संधी देण्यात अाली. मात्र, ताे सहाव्या स्थानावरून फलंदाजी करेल. त्याच्याकडून टीमला अव्वल कामगिरीची अाशा अाहे. दुखापतीने त्रस्त असलेल्या हार्दिकला विश्रांती देण्यात अाली.   

 

३ वेगवान गोलंदाज, १ फिरकीपटू
अाघाडी घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया अाजपासून मैदानावर उतरणार अाहे. येथील खेळपट्टीचा अभ्यास करून टीममध्ये काहीसा बदल करण्यात अाला. त्यानुसार अाता भारतीय संघ तिसऱ्या कसाेटीमध्ये तीन वेगवान गाेलंदाज अाणि एका फिरकीपटूसाठी खेळणार अाहे. ईशांत शर्मा, शमी अाणि जसप्रीत बुमराहवर वेगवान गाेलंदाजीची मदार असेल. तर, रवींद्र जडेजा हा फिरकीपटूच्या भूमिकेत असेल.  

 

जिंकल्यास ट्राॅफी भारताकडे
या कसाेटी विजयाने  बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी भारताच्या नावे हाेईल. भारताने अाॅस्ट्रेलियाविरुद्धची गत मालिका जिंकली हाेती. त्यामुळे ही मालिका २-२ ने बराेबरीतही राहिली तरी ट्राॅफी भारताच्या नावे हाेईल.  

बातम्या आणखी आहेत...