आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाच्या 32 व्यांदा कसाेटीत 600 पेक्षा अधिक धावा; आजपर्यंत विजयी माेहीम कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- टीम इंडियाने तब्बल ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसाेटी मालिकेचा विजय जवळपास निश्चित केला आहे. त्यासाठी चेतेश्वर पुजारासह (१९३), यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (नाबाद १५९) आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (८१) यांनी सरस खेळी केली. या तिघांच्या अव्वल फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने शुक्रवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीचा पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घाेषित केला. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद २४ धावा काढल्या. 

 

टीम इंडियाने ८६ वर्षांत ३२ व्यांदा कसाेटीत ६०० पेक्षा अधिक धावसंख्या नाेंदवली. असा धावांचा डाेंगर रचून भारताला १७ कसाेटी विजयाचा पराक्रम गाजवता आला. तसेच अशा १४ कसाेटी ड्राॅ झाल्या आहेत. त्यामुळे भारताला असा धावांचा डाेंगर उभा केल्यानंतर अद्याप पराभवाचा सामना करता आलेला नाही. त्यामुळे याच माेठ्या धावसंख्येच्या बळावर चाैथी कसाेटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ ही कसाेटी अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, तरीही यजमान ऑस्ट्रेलियावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवणार आहे. कारण, दाेन विजयांसह भारताने चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारताने ४ बाद ३०३ धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. हनुमा ३ धावांची भर घालून बाद झाला.

 

पुजारा (१९३) आणि पंतची (१५९)* शतकी खेळी; जडेजाचे (८१) शानदार अर्धशतक 
लाबुशेनच्या षटकात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आपले शतक साजरे केले. यादरम्यान जल्लाेष करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

 

भारताच्या नावे विक्रम; तिसऱ्यांदा डाव घाेषित 
-पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात टीमने सलग तिसऱ्यांदा डाव घाेषित केला. भारताने तिसऱ्या कसाेटीचे दाेन्ही डाव घाेषित केले. 
-१० वर्षांनंतर भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका, न्यूझीलंड) ५०० पेक्षा अधिक धावा काढल्या. २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५०२ धावांची खेळी केली. 

-५९ वर्षांनंतर भारतीय यष्टिरक्षकाची सर्वाेच्च खेळी 
-ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा पहिला भारतीय विकेटकिपर. १९६७ मध्ये इंजिनिअर यांच्या ८७ धावा. 
-५९ वर्षांनंतर पंतची आशियाबाहेर यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत सर्वाेच्च खेळी. मांजरेकर यांच्या १९५९ मध्ये विंडीजमध्ये ११८ धावा. 
-भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाची कसाेटीतील ही तिसरी सर्वाेच्च धावसंख्या 

 

पुजाराने केला ८९ वर्षांचा जुना विक्रम ब्रेक 
-पुजाराने आतापर्यंत या मालिकेत १२५८ चेंडूंचा सामना केला. हा भारतीय फलंदाजाचा विक्रम ठरला. यापूर्वी, द्रविडने २००३-४ मध्ये ऑस्ट्रेलियात १२०३ चेंडूंचा सामना केला हाेता. 
-ऑस्ट्रेलियात ८९ वर्षांनंतर फलंदाजाने एका मालिकेत १२३७ चेंडू खेळले अाहेत. यापूर्वी १९२८-२९ मध्ये इंग्लंडच्या हर्बटच्या नावे १२३७ चेंडूंची नाेंद. 

 

ऋषभ-जडेजाची द्विशतकी भागीदारी 
भारताकडून युवा फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा दाैऱ्यात चमकला. त्याने शानदार खेळी करताना दीड शतक झळकावले. त्याने नाबाद १५९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ऑलराऊंडर रवींद्र जडेजासाेबत सातव्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला धावांचा माेठा डाेंगर उभा करता आला. तसेच जडेजाने अर्धशतक साजरे केले.