आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसप्रीत बुमराहचे विक्रमी बळी; टीम इंडियाने घेतली 346 धावांची अाघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराहने (६/३३) अापल्या करिअरमधील सर्वाेत्तम खेळी करताना टीम इंडियाची शुक्रवारी यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसाेटीवरची पकड अधिक मजबूत केली. या गाेलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या डावात यजमान अाॅस्ट्रेलियाला अवघ्या १५१ धावांवर गुंडाळले. यातून भारताने पहिल्या डावामध्ये २९२ धावांची अाघाडी मिळवली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ५४ धावा काढल्या. टीमचा सलामीवीर मयंक अग्रवाल (२८) अाणि ऋषभ पंत (६) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. अाता भारताकडे ३४६ धाावांची अाघाडी झाली अाहे. याच अाघाडीचा अालेख उंचावण्यासाठी मयंक अाणि ऋषभ सज्ज झाले अाहेेत. अाॅस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्सने ४ विकेट घेतल्या.

 

यजमान अाॅस्ट्रेलिया संघाने कालच्या बिनबाद ८ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळच्या सत्रात वेगवान गाेलंदाज ईशांत शर्माने विकेटचे खाते उघडले. त्याने ११ व्या षटकात फिंचला (८) बाद केले. त्यापाठाेपाठ बुमराहने विकेटचा धडाका उडवण्यास सुरुवात केली. त्याने हॅरिसला (३३) ईशांतकरवी झेलबाद केले.

 

अाॅस्ट्रेलियाकडून फलंदाज पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले. गाेलंदाज पॅट कमिन्सने हीच उणीव दूर करताना चार विकेट घेतल्या. त्याने टीम इंडियाचे अाघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद केले. त्याने सलामीवीर हनुमा विहारी (१३), पुजारा (०), काेहली (०) अाणि रहाणेला (१) बाद केले. तसेच हेझलवूडने एक बळी घेतला. त्याने राेहितला बाद केेले.

 

बुमराहच्या ९ चेंडूंमध्ये ३ विकेट
बुमराह तिसऱ्या दिवशी चमकला. त्याने ६५ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पेनला बाद करून अापली पहिली विकेट घेतली. त्यानंतर ६७ व्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर नॅथनची (०) विकेट काढली. त्याने ९ चेंडूंत ३ बळी घेतले. यातून अाॅस्ट्रेलियाने ६६.५ षटकांत १५१ धावांवर पहिला डाव गुंडाळला.

 

१४ वर्षांत दुसऱ्यांदा अपयशी
टीम इंडियाला अाघाडी मिळाली अाहे. मात्र, भारताला मागील १४ वर्षांत दुसऱ्यांदा यजमान अाॅस्ट्रेलियाला फाॅलाेअाॅन देता अाला नाही. यापूर्वी २०१४ मध्ये सिडनी कसाेटीत भारताला २३१ धावांची अाघाडी मिळाली हाेती.

 

बुमराह अाशियातील एकमेव गाेलंदाज ठरला
बुमराहने ३३ धावांत ६ बळी घेऊन नवा विक्रम रचला. तो एकाच कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला. त्याने जानेवारीत आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात ५४ धावांत ५ बळी घेतले होते. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या डावात ८५ धावांत ५ गडी बाद केले. त्याने यंदाच कसोटीत पदार्पण केले आहे. त्याने सत्रात सर्व कसोटी सामने भारताबाहेर खेळले आहेत. यामध्ये आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. त्याने पदार्पणात पहिल्याच वर्षी सर्वाधिक ४५ बळी घेण्याचा विक्रमही केला.

 

बातम्या आणखी आहेत...